भरले गाजर (Bharle Gajar Recipe In Marathi)

#BR2
सर्वच गृहिणींना रोज भाजी काय करावी ?? हाच प्रश्न पडलेला असतो . त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो .
आज मी भरले गाजर लभाजी करून पाहिली मस्त झालीय . गृहिणींनो तुम्ही पण करून पहा . आता कृती पहा ...

कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुऊन, त्याच्या उभ्या फोडी करा. प्रत्येक फोडीला मधून छेद द्या. शेंगदाण्याच्या कुटात वाटलेला लसूण, काळा मसाला, हळद, मीठ टाकून मिश्रण तयार करा. ते चांगले मिक्स करून,गाजराच्या फोडीत भरा
- 2
गॅसवर कढईत तेलाची फोडणी ठेवा. त्यांत मोहरी, जीरे तडतडू द्या. त्यांत हळद, लाल तिखट,कढीपत्ता व भरलेल्या गाजराच्या फोडी टाका. त्यातच उरलेल्या शेंगदाणा कुटाचे मिश्रण टाका. वरून 1 ते दीड वाटी गरम पाणी टाकून छान ढवळा. कढईत वर झाकण झाकून 5 ते 7 मिनिटे भाजी वाफू द्या.
- 3
मस्त खमंग भरल्या गाजराची भाजी तयार !!
तयार भाजीवर कोथिंबीर पेरून ती गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या