भेद्र्याची कढी (bhedryachi / Tomato chi kadhi recipe in marathi)

#KS3
"विदर्भ" हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे. 'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. विदर्भाचा इतिहास असा खूपच प्राचीन आहे. त्या विदर्भातील पारंपरिक पदार्थ आज आपण पाहणार आहोत..
नाव जरी थोडं विचित्र असलं तरीही हा एक अस्सल विदर्भीय गावाकडचा पदार्थ आहे. खूप झटपट, दही/डाळ यांच्याशिवायचा आणि साध्याशा गोष्टींनी बनणारा असल्याने विदर्भातील खेडोपाडी बनतोच बनतो!
भेद्रे म्हणजे देशी / जवारी टोमॅटो! ते आपल्या नेहमीच्या टोमॅटोंपेक्षा छोटे, खूप लाल नसलेले, जरा जास्त आंबट आणि मऊ असतात... मी इथे आपले नेहमीचेच टोमॅटो वापरले आहेत.. आंबटपणा वाढविण्यासाठी तुम्ही थोडी आमचूर पावडर वापरु शकता.. पण, पारंपरिक पद्धतीमध्ये टोमॅटोचाच वापर असतो.. ही रेसिपी थोडी दाक्षिणात्य टोमॅटो रस्सम किंवा सिंधी कढी शी साधर्म्य दाखवते.. तुम्हांला नक्कीच आवडेल..

कुकिंग सूचना
- 1
पहिल्यांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. आलं + लसूण + हिरवी मिरची ठेचून घ्यावी.
- 2
एका पातेल्यात, तेल गरम करून मोहोरी, जीरे, मेथीदाणे, हिंगाची नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात ठेचलेली आलं लसूण मिरची घालावी.
- 3
चिरलेले टोमॅटो त्यात परतवून ५ - ७ मिनिटे झाकण लावून शिजवावे. टोमॅटो छान मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट घालून मिक्स करावे.
- 4
साधारण दोन पेले पाणी, चवीनुसार मीठ आणि थोड्या पाण्यात कालवलेले बेसन टोमॅटोच्या मसाल्यात घालून नीट ढवळून घ्यावे.
- 5
कढीला एक उकळी येऊ द्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी. माझ्याकडे ताजी कोथिंबीर उपलब्ध नसल्याने मी सुकवलेली घातली आहे..
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (6)