प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#pcr

नानकटाईला परफेक्ट क्रॅक्स येणं हे नानकटाईचे उत्तम sign आहे. यामुळेच नानकटाई एकदम क्रिस्पी आणि खस्ता बनते.
चहासोबत या नानकटाई खाण्याचा स्वाद काही औरच!!😊😊
ही नानकटाई कुकर आणि ओव्हन दोन्ही मधे बनवू शकतो.
पाहूयात रेसिपी.

प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)

#pcr

नानकटाईला परफेक्ट क्रॅक्स येणं हे नानकटाईचे उत्तम sign आहे. यामुळेच नानकटाई एकदम क्रिस्पी आणि खस्ता बनते.
चहासोबत या नानकटाई खाण्याचा स्वाद काही औरच!!😊😊
ही नानकटाई कुकर आणि ओव्हन दोन्ही मधे बनवू शकतो.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 ते 30 मि.
20 ते 30 सर्व्ह
  1. 3कप मैदा
  2. 1.5 कप पिठीसाखर
  3. वेलचीपूड
  4. 1.5 कप वनस्पती तूप
  5. 1.5 टेबलस्पूनबारीक रवा
  6. पिस्त्याचे बारीक काप
  7. चिमूटभर मीठ
  8. चिमूटभर खायचा सोडा

कुकिंग सूचना

25 ते 30 मि.
  1. 1

    परातीमधे तूप घेऊन तळहाताने छान फ्लफी होईपर्यंत फेसून घ्या. परातीमधे तूप छान फेसले जाते.

  2. 2

    असे क्रिम सारखे मिश्रण झाले पाहिजे. तरच आपली नानकटाई खस्ता बनेल.

  3. 3

    आता त्यात वरील सर्व साहित्य चाळून घ्या. व हलक्या हाताने एकत्र करून गोळा तयार करा.

  4. 4

    त्यांचे छोटे लिंबाएवढे गोळे करून तळहातावर वरच्यावर दाबून घ्या. मधोमध ड्रायफ्रूटस घालून प्रेस करा.

  5. 5

    कुकरमध्ये रिंग घालून प्रिहीट करून घ्या‌. प्लेटला ॲल्युमिनियम फाॅईल पेपर लावून त्यावर नानकटाईचे गोळे अंतर ठेऊन ठेवा.मी इथे 4 च ठेवले आहेत.
    कुलकरची रिंग,शिट्टी काढून कुकर बंद करून 25 मि.स्लो फ्लेमवर बेक करा.

  6. 6

    नानकटाई पूर्णपणे थंड झाल्यावर मस्त चहासोबत खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes