विदर्भचा काळा मसाला (kala masala recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#KS3

विदर्भचा काळा मसाला म्हटले की नॉनव्हेज प्रेमीना सहसा फक्त झणझणीत नॉनव्हेज डिशेस आठवतात. मी स्वतः शुद्ध शाकाहारी आहे. पण तरीही हा काळा मसाला आमच्याकडे बनवला जातो. कारण हा मसाला शाकाहारी डिशेसला पण मस्त दमदार चव आणून देतो. हा मसाला भरली वांगी, शिमला मिरची, पनीर यासारख्या भाज्यां करताना तसेच कोणत्याही डाळ रस्सा,आमटी मध्ये देखील वापरून झणझणीत विदर्भि चवीचे शाकाहारी जेवण बनवू शकतो. हा मसाला वापरून बनवलेली डिश सुद्धा लवकरच पोस्ट करेन. चला तर रेसिपी पाहूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
  1. 1 वाटीधने
  2. 2 चमचाजीरे
  3. 1/2 चमचामिरे
  4. 1/2 चमचालवंग
  5. 2 चमचेहिरवी वेलची
  6. 2 चमचेचक्रीफुल
  7. 1 चमचाशहजिरे
  8. 1 चमचादालचिनी
  9. 2 चमचेसुके खोबरे
  10. 1/2 चमचामोहरी
  11. 1 चमचामसाला वेलची/ मोठे काळा वेलदोडे
  12. 1/2 चमचामेथी
  13. 1 चमचाजायपत्री
  14. 2 चमचेदगडफुल
  15. 2 चमचेखसखस
  16. 1बारीक केलेले जायफळ
  17. 10तमालपत्र
  18. १०-१२ सुक्या लाल मिरच्या
  19. 1 चमचाकसुरी मेथी
  20. 1 चमचाबडीशेप
  21. 1/2 चमचामीठ/ चवीनुसार (ऑप्शनल)
  22. 2-3 चमचेतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल गरम करा. तेल गरम झाले की सगळे मसाले त्यात भाजून घ्यायचे आहेत. मसाले भाजताना गॅस मंद ठेवूनच भाजायचे आहे.

  2. 2

    खाली फोटोमध्ये पाहू शकता. वरती दिलेल्या प्रमाणात घेतलेले सर्व मसाले भाजून घेतले आहेत.

  3. 3

    मसाले भाजून झाले की थंड होऊ द्यायचे. थंड झाले की मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. खलबत्ता असेल आणि त्यावर मसाले कुटून बारीक करू शकत असाल तर उत्तमच. मसाला वाटताना त्यात थोडेसे मीठ घाला. हे ऑप्शनल आहे.

  4. 4

    असा आपला विदर्भचा काळा मसाला तयार आहे.

  5. 5

    तळटीप : यामध्ये मी वाटताना थोडेसे मीठ घातले आहे. हे ऑप्शनल आहे. मी ह्या मसाल्याचा वापर दह्यामध्ये घालून कधी तरी चटणी सारखा करते. म्हणून मी थोडेसे मीठ वापरले आहे. मीठ घालणार असेल तर भाजी आमटी बनवताना मसाल्यात घातलेले मिठाचे प्रमाण लक्षात घेऊन, भाजीत मीठ घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes