झुणका भाकरी (zunka bhakhri recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#KS3
आजगुरुवार गजाननाचा दिवस
विदर्भाचे पंढरपूर म्हणून शेगाव ओळखले जाते
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे.  २३ फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसले. उंच, तांबूस वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोहचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले असे समजत. महाराजांचा वेद आणि ऋचा यांचा ही दांडगा अभ्यास होता प्रथमादृष्ट्या ते उष्ट्या पत्रवालीतून अन्न वेचून खाताना दिसले. तसेच झुणका- भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याचा शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते. एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे.
गजानन महाराज योगी पुरूष होते. भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात. म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास भक्त लांबून येतात.
आज आमचा एक ग्रुप शेगाव संस्थानकडून दिलेल्या गुरुचरित्राचे सगळे मिळून पारायण करत आहोत . न चुकता बरीच वर्ष झाली हे व्हाट्सअप वरचे पारायण ग्रुप खूप व्यवस्थित रित्या चालू आहे रोजचे पारायण ,संपुट पारायण ,असे वेगवेगळ्या पारायण करून भक्त गजानन महाराजांची कृपा दृष्टी आशीर्वाद प्राप्त करत आहे
माझाही दर गुरुवारी पारायणाचा पाठ असतो त्या निमित्ताने झुणका-भाकरी ठेचा तयार करते आणि नैवेद्य दाखवून परिवाराबरोबर जेवणातून हे पदार्थ घेतो जे आपल्या आरोग्यासाठी योग्यही आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीट
3व्यक्ती
  1. झुणका साठी लागणारे साहित्य
  2. 1 कपबेसन
  3. 1/4 टीस्पूनप्रमाणे हळद, लाल मिरची, धणे पावडर,
  4. मीठ
  5. 1-1/2 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टेबलस्पूनमिरची लसूण कुटलेले
  7. 1/4 टीस्पूनहींग
  8. 1कांदा कट केलेला
  9. 1/4 टीस्पूनहळद पावडर
  10. चवीनुसारमीठ
  11. कोथंबीर बारीक चिरलेली
  12. भाकरीसाठी लागणारे साहित्य
  13. 1-1/2ज्वारीचे पीठ
  14. चिमुटभरमीठ
  15. पाणी पीठ मळण्यासाठी

कुकिंग सूचना

40 मिनीट
  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात दिल्या प्रमाणे मसाले टाकून घेऊ आणि थोडे तेल टाकून,पाणी टाकून पातळ असे बॅटर तयार करून घेऊ

  2. 2

    कडईत तेल तापवून त्यात मोहरी जीरे हिंग टाकून मिरची लसूण कुटलेले परतून घेऊन त्यात कांदा परतून घेऊन कांदा परतून झाल्यावर हळदी पावडर टाकून घेऊ

  3. 3

    आता तयार बेसन चे बॅटर फोड़नी वर टाकून एक सारखे खुरपीने परतत राहावे म्हणजे गुठळी पडणार नाही

  4. 4

    खत खत असे बेसन शीजत राहते वरून झाकण ठेवून शिजवून घेऊन

  5. 5

    आता तयार झुणक्या वर कोथिंबीर टाकून घेऊ

  6. 6

    ज्वारीच्या भाकरी पीठ घेऊन त्यात मीठ टाकून गरम पाणी टाकून पीठ घासुन मळून
    घेऊ

  7. 7

    पोळपाटावर पीठ टाकून भाकरी थापून घेऊन

  8. 8

    गरम तव्यावर टाकून एका साईडने पाणी लावून भाजून घेऊ

  9. 9

    तयार भाकरी गॅस वर फुलून घेऊन

  10. 10

    तयार झुणका भाकरी ठेचा

  11. 11

    भाकरी आणि झुणका नैवेद्यासाठी तयार करून घेऊ
    नैवेद्याच्या ताटात भाकरी झुणका ठेचा आणि कांदा ठेव दाखवून प्रसादाचा आनंद घेऊ

  12. 12
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes