व्हेज खिमा पाव (veg kheema pav recipe in marathi)

#BFR लहानपणी आमचा सख्खा शेजार म्हणून आम्हाला एक पंजाबी कुटुंबीय मिळाले होते. आईची त्या Aunty शी खूपच चांगली मैत्री होती. त्यांच्याकडून आई बरेच पंजाबी पदार्थ जसं छोले-भटूरे, जीरा राईस, राजमा चावल, व्हेज खिमा, गाजर चा हलवा, रोटी चे विविध प्रकार शिकली होती. अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांच्याच कडून आम्हाला खजिना रूपातच सापडल्या. त्यांच्याकडून आलेल्या रेसिपीज् पैकी माझी आई व्हेज खिमा दोन पद्धतीने बनवायची सोयाबीनच्या चुर्यापासून आणि दुसरी फ्लॉवर किसून त्यापासून! दोन्हीही अप्रतिम व्हायच्या पण माझी आवडती होती फ्लॉवरवाली रेसिपी.. ❤️ फ्लॉवर ची व्हेज खिमा रेसीपी मी पुन्हा कधीतरी शेअर करेन.
आज मात्र मी पूर्ण प्रोटिन्स आणि फायबर्स ने खचाखच भरलेला असा सोयाबीनच्या चुर्यापासून केलेला व्हेज खिमा सादर करत आहे. त्याला कारणही तसेच आहे, कुकपॅड मराठीचे ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज! सकाळचा नाश्ता परिपूर्ण असेल तर अख्खा दिवस उत्साही जातो. तसंच हा पदार्थ बनवायला ही सोपा आहे आणि प्रोटिन्स्, फायबर्स नी भरलेला असल्यामुळे दुपारी च्या जेवणापर्यंत पोट टम्म ठेवायला मदत करणारा आहे.
आईमुळे रेसिपी ला नॉनव्हेज चा फील देण्यासाठी ओलं खोबरं ही घालण्याची सवय लागली. तसंच, व्हेज खिमा करताना मी नेहमी नगेटस् भिजवून, पिळून मिक्सरवर बारीक केलेला चुरा वापरते. कारण, मार्केटमध्ये तयार मिळणारा चुरा खूपच भुरभुरीत असतो. डिश बनल्यावर मिळून येत नाही, चोथा-पाणी होते. ही टीप लक्षात ठेवून केल्यास खूप छान रिझल्ट मिळतो. चला तर मग रेसिपी कडे वळूया ...

कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी सोयाबीनचे नगेट्स मीठ असलेल्या गरम पाण्यात दहा मिनिटे झाकण लावून ठेवून द्यावे. नंतर लगेच पिळून त्यातले पाणी काढून टाकावे आणि मिक्सर मध्ये एक दोनदा गरके मारून घ्यावेत.
- 2
नंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे + कांदा + टोमॅटो + हिरव्या मिरच्या + आलं लसूण पेस्ट दह्याबरोबर गुळगुळीत वाटून घ्यावे.
- 3
कढईत ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात अख्खे खडे मसाले, हिंग, हळद, तिखट, किचन किंग मसाला / बिर्याणी मसाला घालून मग तयार वाटण त्यात घालावे. मी इथे फोडणीत थोड्या काजू पाकळ्या घातल्या आहेत. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे.
- 4
मिश्रणाला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
- 5
नंतर त्यात सोयाबीनचा चुरा, मीठ, कसुरी मेथी आणि १/२ वाटी पाणी घालून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी.
- 6
पावांना मध्ये एक चीर देऊन बटरवर छान शेकून घ्यावेत.
- 7
तयार सोया खिमा पाव आणि कांदा याबरोबर सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)