उपवासाची खमंग काकडी

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834

#कोशिंबीर
उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे आपण करतोच त्यासोबत हिरवी चटणी किंवा गोड दही हाच पर्याय सर्वजण निवडतात . पण १० मिनिटांचा वेळ काढून हि खमंग काकडी बनवून खा त्या खिचडी वड्यासोबत बघा त्याची लज्जत अगदी न्यारीच .

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. २ मध्यम आकाराच्या काकड्या
  2. 1वाटी दही
  3. १ लहान चमचा सैंधव मीठ
  4. १ मोठा चमचा साखर
  5. १/२ वाटी शेंगदाणे भाजून त्याचं कूट
  6. २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  7. १/२ लिंबू रस
  8. १ लहान चमचा तूप
  9. १/२ चमचा जिरं

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक चिरून अथवा किसणीवर जाडसर किसून घ्यावी

  2. 2

    दाण्याचे कूट, मिरच्या साखर, मीठ, लिंबाचा रस हे सर्व तयार ठेवावे

  3. 3

    आता एका पसरट भांड्यात दही, साखर मीठ काकडी, दाण्याचे कूट आणि लिंबू रस घालून एकत्र करावे

  4. 4

    आता एका फोडणीपात्रात तूप गरम करून त्यात जिरं घालून ते तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे आणि गरम फोडणी काकडीच्या मिश्रणात ओतून छान एकत्रित करावे.

  5. 5

    आपली खमंग काकडी खायला तयार.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

Similar Recipes