खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#shr
#cooksnap_challenge

#खमंग_काकडी..🥒🥒

चातुर्मास सुरु झाला की उपास तापास, व्रत वैकल्ये ,बहुतेक सगळे सण ,देवधर्म,कुळाचार यांची नुसती रेलचेल असते...पावसाबरोबरच या सार्या परंपरा आपण उत्साहात साजर्या करतो..घरादारात,वातावरणात चहुकडे चैतन्य सळसळत असते..आणि हेच चैतन्य आपल्या तनामनाचा कब्जा घेते..आपल्यावर गारुड करते..आणि आपल्याला positivity देते..म्हणून कितीही नाही म्हटले तरी दरवर्षी आपण आपल्या या परंपरांचा, संस्कृतीचा,उत्सवांचा अविभाज्य घटक बनून आनंद लुटतो..आणि हा आनंद आपण आपल्या खाद्यजीवनातही उतरवतो..मग हेच आपले comfort food आपली comfort level वाढवते..आणि आपण सुखावतो..असाच एक पदार्थ म्हणजे खमंग काकडी...या नावातच इतका खमंगपणा आहे की चवीच्या बाबतीत बोलायचीच सोय नाही..इतकी चविष्ट आणि रुचकर...म्हणूनच या कोशिंबीरीला खमंग काकडी हे नांव पडले असावे...
आज मी माझी मैत्रिण @shital_lifestyle हिची खमंग काकडी ही रेसिपी cooksnapकेलीये..शितल,खूप मस्त खमंग झालीये ही कोशिंबीर..😋😍.. Thank you so much Shital for this delicious recipe🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 जणांना
  1. 2मोठ्या काकड्या
  2. 1 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  3. 1 टेबलस्पूनखोबरं
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. मीठ चवीनुसार
  6. 5-6 कडीपत्त्याची पाने
  7. 1 इंचआले बारीक तुकडे
  8. कोथिंबीर
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. 1/2 टीस्पूनजीरे
  12. हिंग
  13. 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.

  2. 2

    काकडी स्वच्छ धुवून त्याची साले काढून बारीक चोचून घ्या. आता काकडी पिळून घ्या म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटणार नाही आणि त्यामध्ये दाण्याचा कूट,मीठ, साखर,खोबरे, आल्याचे तुकडे, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. एकीकडे कढल्या मध्ये साजूक तूप घालून जीरे, हिंग मिरच्या, कडीपत्ता घालून खमंग फोडणी करा आणि ही फोडणी आता कोशिंबीरी वर घालून कोशिंबीर एकजीव करा,

  3. 3

    आता यामध्ये लिंबाचा रस घालून परत एकदा कोथिंबीर मिक्स करून घ्या,

  4. 4

    तयार झाली आपली खमंग काकडी..एका डिश मध्ये पोळी भाताबरोबर खमंग काकडी सर्व्ह करा किंवा नुसतीच सुद्धा तुम्ही खाऊ शकता.

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes