टोमॅटो ची भाजी टमाटर कि सब्जी

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834

#goldenapron3 #Sabzi
नेहमी नेहमी काय भाज्या कराव्यात हा यक्ष प्रश्न स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतोच . कधी कधी घरात भाजी सुद्धा नसते . पण कांदा टोमॅटो बटाटा हे पदार्थ मात्र घरोघरी कायम भरलेले असतात . मग घरात भाजी नसेल आणि झटपट होईल अशी एक भाजी म्हणजे हीच टोमॅटो ची भाजी ..याला कोणी चटणी हि म्हणतात ..तर कशी करायची हे पाहूया .

टोमॅटो ची भाजी टमाटर कि सब्जी

#goldenapron3 #Sabzi
नेहमी नेहमी काय भाज्या कराव्यात हा यक्ष प्रश्न स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतोच . कधी कधी घरात भाजी सुद्धा नसते . पण कांदा टोमॅटो बटाटा हे पदार्थ मात्र घरोघरी कायम भरलेले असतात . मग घरात भाजी नसेल आणि झटपट होईल अशी एक भाजी म्हणजे हीच टोमॅटो ची भाजी ..याला कोणी चटणी हि म्हणतात ..तर कशी करायची हे पाहूया .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ७-८ टोमॅटो बारीक चिरलेले
  2. कांदे बारीक चिरलेले
  3. हिरवी मिरची
  4. ५-६ कढीपत्ता पाने
  5. १ टॅब्लेस्पून लाल तिखट
  6. १ टीस्पून हळद
  7. १ टीस्पून धणेपूड
  8. १ टीस्पून कीचांकींग मसाला
  9. १ टीस्पून मीठ
  10. १/२ टीस्पून हिंग
  11. १ टीस्पून मोहरी
  12. १ टीस्पून जिरं
  13. १/२ टीस्पून मेथीदाणे
  14. १ टीस्पून कसुरी मेथीपूड
  15. पाव वाटी दाण्याचं कूट
  16. पाव वाटी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कांदे टोमॅटो मिरची बारीक चिरून घ्यावी

  2. 2

    सर्व साहित्य हाताशी तयार ठेवावे. कढईत तेल तापत ठेवावे

  3. 3

    आता तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरं मेथी दाणे हिंग कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालावी ती तडतडली कि त्यावर हळद लाल तिखट इतर मसाले घालून छान परतून घ्यावे. मग त्यात कांदा घालून मऊ होईपर्यंत परतावा. कांदा सोनेरी रंगावर आल्यावर टोमॅटो घालून परतावे. मीठ घालावे. आणि झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावे. १० मिनिटांनी झाकण काढून त्यात दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून एकत्र करून सर्व करावे.

  4. 4

    हि भाजी प्रवासात सुद्धा पुरी पराठा किंवा चपाती सोबत घेऊन खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes