कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. कधी घरी भाजी नसेल तर कुरडई, पापड,सांडगे या भाज्या उन्हाळा मध्ये केले जातात. त्यातीलच ही कुरडई कांदा भाजी. गावाकडे या भाज्या केल्या जातात. खूप छान टेस्टी होते.

कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)

अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. कधी घरी भाजी नसेल तर कुरडई, पापड,सांडगे या भाज्या उन्हाळा मध्ये केले जातात. त्यातीलच ही कुरडई कांदा भाजी. गावाकडे या भाज्या केल्या जातात. खूप छान टेस्टी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 -20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 6-7कुरडई
  2. 1कांदा
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 4-5कढीपत्ता पाने
  7. चिमूटभरहिंग
  8. चवीनुसारमीठ
  9. 1-2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 -20 मिनिट
  1. 1

    प्रथम कुरडई घेऊन त्याचा चुरा करून घेणे. तो चुरा 10-15 मिनिट पाण्यात भिजत घालून ठेवणे. कांदा चिरून घेणे.

  2. 2

    कुरडई भिजली कि त्यातील सगळे पाणी निथळून काढणे. आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये कांदा व हळद घालून 2 मिनिट परतून घेणे.

  3. 3

    आता या मध्ये भिजवून घेतलेली कुरडई घालावी व छान परतून घेणे. वरून चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालून भाजी हलवून घेणे. आता वरून थोडे से पाणी शिंपडावे म्हणजे भाजी मऊ छान होते. झाकण ठेवून 3-4 मिनिट वाफ आणावी. गॅस बंद करावा. कुरडई कांदा भाजी तयार झाली.

  4. 4

    मस्त गरम गरम भाजी पोळी किंवा फुलके सोबत सर्व्ह करावी. छान टेस्टी भाजी होते. त्याच नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. मग ही थोडी वेगळी भाजी छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes