रंगीबेरंगी इडली

Bhakti
Bhakti @cook_19715410
Satara

#होळी
होळी ला पुरणपोळी तर असतेच पण गोड सोबत थोडं मसालेदार म्हणून एक वेगळा पदार्थ ही आमच्या कडे बनवला जातो. आज माझ्या मुलाचा हट्ट म्हणून इडली केली आहे.

रंगीबेरंगी इडली

#होळी
होळी ला पुरणपोळी तर असतेच पण गोड सोबत थोडं मसालेदार म्हणून एक वेगळा पदार्थ ही आमच्या कडे बनवला जातो. आज माझ्या मुलाचा हट्ट म्हणून इडली केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्व्हिंग्ज
  1. 3वाटी तांदूळ
  2. 1वाटी उडीद डाळ
  3. 2 टीस्पूनमीठ
  4. 5/6बिट चे तुकडे
  5. 1 टीस्पूनलिंबूसत्व
  6. 1 टीस्पूनसोडा
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आदी तांदूळ व उडीद डाळ वेग वेगळे पाण्यात 4 तास भिजून ठेवले.

  2. 2

    नंतर भिजवलेले तांदूळ व डाळ वेग वेगळे मिक्सर मध्ये वाटून घेतले व हे वाटण एकत्र करून 8 तास आंबवण्यासाठी ठेवले.

  3. 3

    आता इडली करताना इडली पीठ मध्ये सोडा, लिंबूसत्व आणि मीठ टाकून हलवून घेतले. लागल्यास थोडेसे पाणी घालणे.

  4. 4

    आता रंगीत इडली करण्या साठी मी एका वाटीत पाणी आणि हळद, पाणी आणि बिट, पाणी आणि बारीक कुटलेली कोथिंबीर आणि एका वाटीत बिट + हळद असे 4 कलर बनवून घेतले.

  5. 5

    आता इडली लावताना 4 भांड्यात थोडे थोडे पीठ कालवून प्रत्येक मध्ये एक कलर यील असे तयार केलेले कलर चे पाणी मिक्स केले. आणि इडली लावून घेतली काही सिंगल काही मल्टि कलर ची.

  6. 6

    10 मिनिट वाफ दिल्या नंतर सर्व इडल्या काढुन घेतल्या.

  7. 7

    आता इडली तयार आहे गरम गरम सांबर सोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhakti
Bhakti @cook_19715410
रोजी
Satara

टिप्पण्या

Similar Recipes