प्रॉन्स टेम्पूरा (जपानी कोलंबी भजी) (Prawns starter recipe in marathi)

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

काहीतरी नविन करायचे या शोधात हाताशी लागलेला एक साधा सोप्पा पण परदेशी, पण तितकाच भारतीय वाटणारा हा प्रकार.
#सीफूड

प्रॉन्स टेम्पूरा (जपानी कोलंबी भजी) (Prawns starter recipe in marathi)

काहीतरी नविन करायचे या शोधात हाताशी लागलेला एक साधा सोप्पा पण परदेशी, पण तितकाच भारतीय वाटणारा हा प्रकार.
#सीफूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १६ साफ केलेल्या मध्यम आकाराच्या कोलंब्या
  2. अंडे
  3. १" आले
  4. २-३ लसूण पाकळ्या
  5. पातीचा कांदा
  6. २-३ कोथिंबिरीच्या काड्या
  7. १ कप मैदा
  8. पाव कप कॉर्नफ्लोअर
  9. पाव कप तांदळाचे पीठ
  10. २ टेबलस्पून सोया सॉस
  11. १ टेबलस्पून व्हिनेगर
  12. २ टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर पेस्ट
  13. 2 टीस्पूनउरलेले - मिरीपूड
  14. १ टीस्पून साखर
  15. तळण्यासाठी तेल
  16. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सॉससाठी आले-लसूण किसून घ्यावे. पातीचा कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. छोट्या भांड्यात आले-लसूण-कोथिंबीर-पातीचा कांदा, सोया सॉस, व्हिनेगर, साखर, अर्धा टीस्पून मिरीपूड, व अगदी थोडे मीठ घालून एक उकळी आणावी. सॉस जास्त उकळू नये. सोया सॉसमध्ये मीठ असल्याने अगदी कमी मीठ घालावे. कमी खाणाऱ्यांनी नाही घातले तरी चालेल. सॉस तयार आहे. आता मुख्य रेसिपीकडे वळूया.

  2. 2

    कोलंबी स्वच्छ धुऊन, उभी धरून चीर द्यावी. आतील काळा धागा काढून टाकावा. कोलंबीला पुन्हा आडव्या सुद्धा चिरा द्याव्यात, त्यामुळे तळताना कोलंबी गोल वळणार नाही.

  3. 3

    कोलंबीला दीड टीस्पून आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, एक टीस्पून मिरीपूड व चवीनुसार मीठ लावून ठेवावे. आता तिन्ही पीठ एकत्र करून त्यात उरलेले वाटण, मिरीपूड व चवीनुसार मीठ घालून एकसारखे करावे. त्यात अंडे घालून कालवावे. आता थंड पाणी घालून गुठळ्या होऊ न देता एकसार दाट पीठ भिजवावे.

  4. 4

    तेल गरम करून त्यात एकेक कोलंबी पिठात घोळवून सोडावी. गुलाबीसर रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळावी. टिश्यू पेपरवर काढून घ्यावी. वाईन ग्लासमध्ये सॉस घालून वर तळलेले टेम्पूरा घालून गरमच सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes