रवा केक

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

#रवा

सगळ्या आवडणारा

रवा केक

#रवा

सगळ्या आवडणारा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. अर्धी वाटी दही
  2. 1वाटी पिठीसाखर
  3. अर्धी वाटी तेल,तेल नको असल्यास तूप किंवा बटर चालेल
  4. अर्धी वाटी मैदा
  5. दीड वाटी बारीक रवा
  6. 1वाटी दूध
  7. आवडीनुसार व्हॅनिला इसेन्स /वेलची पावडर /किंवा कोणताही इसेन्स
  8. आवडीनुसार ड्राय फ्रुटस/टुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये दही घेऊन त्यात पिठीसाखर घालून नीट फेटून मिक्स करून घ्यावे.त्यानंतर त्यात अर्धी वाटी तेल घालून पुन्हा सगळं नीट फेटून मिक्स करावे.
    त्यानंतर त्यात मैदा घालून हळूहळू मिक्स करावा त्यानंतर रवा घालून हळूहळू करत सगळा रवा मिक्स करून घ्यावा.अर्धी वाटी दूध घालून हे मिश्रण नीट एकजीव करावे. आवश्यकता वाटल्यास अजून थोडं दूध घालावं.

  2. 2

    यानंतर 20 मिनिटं सगळं मिश्रण झाकून ठेवावे.
    20 मिनिटांनी मिश्रण थोडं घट्ट होईल.त्यात उरलेल दूध घालून ते पुन्हा सारख करून घ्यावे.
    मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास त्यात अजून थोडं दूध घातलं तरी चालेल. त्यानंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घालून पुन्हा सगळं मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    आवडीनुसार टुटी फ्रुटी / ड्राय फ्रुटसचे तुकडे घालावेत
    ज्या टिन मध्ये केक करायचा असेल त्याला पूर्ण टोपाला ला तेल/बटर लावून त्यावर सगळीकडे मैदा पसरवून घ्यावा आणि त्यानंतर त्यात तयार मिश्रण घालून सारख पसरवून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

Similar Recipes