टुटी फ्रुटी नानखटाई (tuti fruity nankhatai recipe in marathi)

Rutuja Ghodke
Rutuja Ghodke @cook_25612820
Satara

टुटी फ्रुटी नानखटाई (tuti fruity nankhatai recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
चार ते पाच
  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपबेसन पीठ
  3. १ टेबलस्पून बेकिंग पावडर
  4. 2 टेबलस्पूनरवा
  5. १ कप पिठीसाखर
  6. 1/2 कपसाजूक तूप
  7. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  8. गरजेनूसार दूध
  9. 1/4 कपटुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    प्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये चाळन ठेवून, त्यामध्ये मैदा, बेसन पीठ, रवा, बेकिंग पावडर घेऊन चाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये पिठीसाखर घेऊन चाळून घ्यावी. सर्व एकत्र करावे.

  2. 2

    नंतर त्यात साजूक तूप मिक्स करून, वेलची पूड घालावी. सर्व मिश्रण एकत्र करावे. मळून घ्यावे.

  3. 3

    नंतर तयार पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तो हाताने थोडासा दाबून मध्ये बोटाने थोडेसे खोलगट करावे. ताट टूटीफ्रूटी भरावे. एका ताटाला तूप लावून त्यामध्ये टुटी फ्रुटी भरलेली नानखटाई ठेवावी.

  4. 4

    गॅसवर कढई ठेवून त्यात मीठ घालून ते गरम करून घ्यावे. त्यात एक ठेवून स्टॅन्ड ठेवून त्यावर नानखटाईचे ताट ठेवावे. वरून पक्के झाकण ठेवावे. मध्यम आचेवर नानखटाई बेक होऊ द्यावी.

  5. 5

    बेक झालेली नानकटाई सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Ghodke
Rutuja Ghodke @cook_25612820
रोजी
Satara

टिप्पण्या

Similar Recipes