रवा इडली

Kshama Wattamwar
Kshama Wattamwar @cook_21826654

#रवा रेसिपी
अगदी घरात असलेल्या साहित्यापासून छान चविष्ट, रंगीबिरंगी आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी.

सध्या सुरू असलेल्या रवा स्पेशल रेसिपी मध्ये भाग घ्यावा, म्हणून रवा इडली करायचे ठरवले.
हा पदार्थ माझ्या सासूबाईंनी शिकवला आहे.

तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, जरूर करून पाहा.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३-४
  1. २ वाटी रवा मिडीयम रवा
  2. २पळीतेल
  3. जिरे
  4. मोहरी
  5. १ चमचा उडद डाळ
  6. १ चमचा चणा डाळ
  7. ५-६काजू (तुकडे करून) आवडत असेल तर
  8. १०-१२कडीपत्ता पान
  9. गाजर (किसून)
  10. २ मोठे चमचे ओल खोबर (खवलेल)
  11. कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  12. २-३ वाटी ताजे दही
  13. चवीनुसारमीठ
  14. २ चिमूट (१/४च)खाण्याचा सोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम तेल गरम करून त्यात, मोहरी जिरे, उडद डाळ, चना डाळ टाकून छान सोनेरी रंगावर परतून घ्यावे. नंतर त्यात काजू तुकडे, कडीपत्ता टाकून परतावे.

  2. 2

    गॅस मंद आचेवर ठेवावा. रवा टाकून छान परतावे. खमंग सुवास येईपर्यंत भाजावे. त्यात खोबरं, गाजर, कोथिंबीर टाकून मिक्स करावे. गॅस बंद करावा.

  3. 3

    मीठ चवीनुसार, खाण्याचा सोडा टाकून मिक्स करावे. मिश्रण थंड करावे.

  4. 4

    दही एका भांड्यात थोडे फेटून घ्यावे व लागेल तसे तयार मिश्रणात टाकावे व छान मिक्स करावे. जास्त घट्ट किंवा पातळ असू नये मिश्रण. इडली पिठाप्रमाणे असावे.

  5. 5

    इडली भांड्याला तेल किंवा तूप लावून बॅटर टाकून ७-८ मिनिटे वाफवून घ्यावे. रवा इडली तयार. खोबरा चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Kshama Wattamwar
Kshama Wattamwar @cook_21826654
रोजी

Similar Recipes