पास्ता विथ इंडो- इटालियन ग्रेव्ही (pasta with indo-italian gravy recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

पास्ता आपण इटालियन पद्धतीने तयार करतो आज मी त्यामध्ये आपले रोजच्या वापरातले मसाले वापरून त्याला भारतीय स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे...

पास्ता विथ इंडो- इटालियन ग्रेव्ही (pasta with indo-italian gravy recipe in marathi)

पास्ता आपण इटालियन पद्धतीने तयार करतो आज मी त्यामध्ये आपले रोजच्या वापरातले मसाले वापरून त्याला भारतीय स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 mins
3 जणांसाठी
  1. 150 ग्रॅमपास्ता
  2. 1छोटा कांदा चिरून
  3. 1छोटा टोमॅटो चिरून
  4. 4-5लसूण पाकळ्या बारीक चिरून
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1छोटी भोपळी मिरची चिरून
  8. 1/2 टीस्पूनधना जीरे पावडर
  9. 1/2 टीस्पूनकसुरी मेथी
  10. 1-2लाल सुक्या मिरच्या
  11. 1/2 टीस्पूनजीरे
  12. 1/2 टीस्पूनओरिगानो
  13. 1 टेबलस्पूनमैदा
  14. मीठ चवीनुसार
  15. 1चीज क्युब किसून
  16. 1 टीस्पूनचीज टोमॅटो सॉस (optional)
  17. 2 टेबलस्पूनअमुल बटर
  18. 1 टेबलस्पूनतेल
  19. 1/4 कपदूध
  20. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

30 mins
  1. 1

    प्रथम पास्ता उकळत्या पाण्यामध्ये मीठ घालून 6-7 मिनिटे शिजवून घ्या. मग तो चाळणी मध्ये काढून त्यावर थोडे तेल लावून ठेवा. एका भांड्यात थोडे अमुल बटर आणि तेल घालून त्यात प्रथम जीरे,लसूण, कांदा, सुक्या मिरच्या नीट परतून घ्या. मग त्यात टोमॅटो घालून मिक्स करा व थोडा वेळ शिजवा.

  2. 2

    आता वरील मिश्रणात सर्व मसाले, मीठ (ओरिगा नो सोडून) घाला. परतून घ्या त्यात थोडे पाणी घालून एकजीव करा. मग त्यात मैदा घालून मिक्स करा व त्यात दूध घालून चांगले शिजवा.

  3. 3

    आता मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे, गरज पडल्यास पाणी घाला. परत भांड्यात अमुल बटर, तेल थोडे थोडे घालून त्यात मिक्सर मधील ग्रेव्ही घाला, एक उकळी आणा. त्यात चीज किसून घाला व नंतर पास्ता आणि चीज टोमॅटो सॉस घालून मिक्स करा. सर्वात शेवटी सर्व्ह करताना ओरीगानो घालून द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes