बेसनाचे चुरमा लाडू

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#बेसन

या लाडुना मुटक्याचे/दामट्याचे/डाळीच्या पुरीचे लाडू असेही म्हणतात.सध्या ब3सण लाडवापेक्षा हे चवीला अतिशय सुरेख लागतातच पण याना तूपही कमी लागते.करायला अतिशय सोपे.बेसन भाजायची ग4ज नाही त्यामुळे खूप मोठा व्याप तर वाचतोच,पण बेसन करपण्याचीही भीती नाही.बुंदी किंवा मोटिचुरसारखी कळ्या गोलच पडल्या पाहिजेत ,याचा ताण नाही.याच्या पुऱ्या गोल झाल्या नाहीत तरी काही बिघट नाहीत.पुऱ्या लाटायच्या नसतील तर मुटके कटुन टाळले तरी चालतात.हार्ड आणि फास्ट असा कोणताही नियम नाही.

आपल्या आद्य सुगरणींनी वेगवेगळ्या पद्धती शोधून आपली रसना समृद्ध केली आहे. कारण याचा पाक कोणी गोळीबंद करतं तर कोणी एकतारी,तर कोणी डोनतारी.तेव्हा अजिबात धास्ती न घेता करून पहा हे लाडू,तुम्हाला आवडतील याची खातरजमा माझ्याकडे लागली.

घ्या तर साहित्य जमवायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रॅमरवाळ बेसन
  2. 20 ग्रॅमबारिक रवा
  3. 200 ग्रॅमसाखर
  4. 150 ग्रॅमतळण्यासाठी तूप
  5. 20 ग्रॅमवेलचीपूडय
  6. 50 ग्रामतुकडा काजू
  7. 25 ग्रामबदाम पिस्ता काप
  8. 10/12केशराचे धागे
  9. 5 ग्रॅमखयचं पिवळा रंग (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसनात रवा मिसळून पीठ घट्ट मळून घ्या. अर्धा तास तसेच झाकून ठेवा.

  2. 2

    गोळे करून सुक्या बेसनावर पुऱ्या लाटून घ्या.

  3. 3

    तूप तापवून पुऱ्या मंद आचेवर तळून घ्या.

  4. 4

    थोड्या थंड होऊ द्या.मग कोमट असतानाच हाताने चुरून घ्या. मिक्सरमधून काढा.

  5. 5

    साखर भिजेल इतकेच पाणी घालून एकतारी पाक करा,तुम्हाला हवा असेल तर पक्का पाक करा.

  6. 6

    गॅस बंद करून थोडा थोडा पाक चुऱ्यात,काजू तुकडा,बदाम पिस्ता कप वेलचीपूड टाकून मिश्रण एकजीव करा.लागेल तसा पाक घाला.पूर्ण मिश्रण भिजले की व्यवस्थित ढवळून घ्या.

  7. 7

    मध्ये मध्ये ढवळत रहा.मिश्रण थंड झाले की लाडू वेळ.मिश्रण मळून मळून घ्या

  8. 8

    चविष्ट लाडवांचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नूतन सावंत
रोजी

Similar Recipes