अमु राईस

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

आजची रेसिपी मला माझ्या मुलाने सुचविली , मी पण विचार करतच होती की आज काय नवीन बनवायचे , आज काल च्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने बनलेले पदार्थ च आवडतात.तर मग मी पण माहतले तू समोर रहा आणि मला रेसिपी सांग तर तो पणं तयार झाला आणि आजची डिश शेवटी बनली

अमु राईस

आजची रेसिपी मला माझ्या मुलाने सुचविली , मी पण विचार करतच होती की आज काय नवीन बनवायचे , आज काल च्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने बनलेले पदार्थ च आवडतात.तर मग मी पण माहतले तू समोर रहा आणि मला रेसिपी सांग तर तो पणं तयार झाला आणि आजची डिश शेवटी बनली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पूर्ण वेळ 10 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 ग्लासतांदूळ
  2. 1 पाव पत्तागोबी
  3. 1मोठा कांदा
  4. 3सिमला मिरची
  5. 1 टीस्पूनकाळी मिरे पावडर
  6. 1 टेबलस्पूनअड्रक किसलेले
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 8अंडे
  10. 1 टीस्पूनकाळी मिरे पावडर
  11. तेल
  12. 1 वाटीटोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

पूर्ण वेळ 10 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम तांदूळ चा साधा भात कुकर मध्ये बनवून घ्या, व सर्व भाज्या बारीक कापून घ्या. एका कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करा व बारीक कापलेला कांदा टाका, कांदा थोडा होवू द्या व त्यात किसलेले अद्रकं आणि भाज्या टाका

  2. 2

    आता भाजी मधे मीठ व मिरे पावडर व तिखट घालून शिजू द्या जास्त शिजवायचे नाही, 3,4 मिनिट फ्राय करायचे व त्यात सॉस टाका व मिक्स करा व आता ह्यात भात घालून चांगले मिक्स करा..व थोडे 3,4 मिनिट होवू द्या

  3. 3

    आता एका भांड्यात दोन अंडे फोडून टाका व त्यात थोडे मीठ व मिरे पावडर टाका व चांगले मिक्स करा आपण ह्याचे ऑमलेट बनवणार आहोत आता कढई त टाका आता ऑमलेट पूर्ण व्हायच्या अगोदर त्यात राइस टाका फोटो मधे दाखवल्या प्रमाणे व त्याला फोल्ड करा

  4. 4

    व आता हा ऑमलेट राइस रोल प्लेट मध्ये कढई च्या साहाय्याने टाका व टोमॅटो सॉस टाकून सर्व करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes