दालमोठ (dal moth recipe in marathi)

Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944

दालमोठ (dal moth recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. शेव साठी :
  2. 1किलो राणी बेसन(चाळून घ्यावे)
  3. 2टेबलस्पून मीठ
  4. 1/4टीस्पून पापडखार
  5. 2कप पाणी
  6. 2कप तेल
  7. दालमोठ साठी :
  8. 1किलो अख्खा मसूर
  9. 1टीस्पून सोडा
  10. 2टेबलस्पून दूध
  11. 1लिटर तेल तळायाला
  12. 1/2टीस्पून मोहरी
  13. 1/2टीस्पून हिंग
  14. 2टेबलस्पून तिखट
  15. 1/2टीस्पून हळद
  16. 1टेबलस्पून काळमीठ
  17. 2टेबलस्पून पीठीसाखर
  18. 1टीस्पून सायट्रीक एसीड ग्रॅन्युल्स

कुकिंग सूचना

  1. 1

    शेव साठी मीठ व पापडखार एक मिनिटे भाजून घ्यावे। पाणी व तेल एकत्र करून त्यात मीठ व पापडखार घालावे. मिश्रण एकत्र झाल की पांढरं होत.

  2. 2

    व्यवस्थीत मिक्स झाल्यावर त्यात बेसन कालवावे. भिजल्या नंतर बेसन थोडं आसट होत. साच्यात भरून शेव तळून काढावी।

  3. 3

    मसूर रात्री पाण्यात भिजत घालायचे, त्यात एक टीस्पून सोडा, 2 टेबलस्पून दूध घालावे, रात्र भर भिजू द्यावे. सकाळी मसूर स्वच्छ धूवून घ्यावे आणि चाळणित निथळायला ठेवावे. साधारण एक तासात पाणी निथळून जाईल मग एका सुती कापडावर घरातच वाळवायला ठेवावे(1-2 तास).

  4. 4

    हलके ओलसर असतानाच तळायला घ्यावे. एका चाळनी मध्ये थोडे-थोडे मसूर घालून तळावे. घातल्या नंतर ते फुटायचा आवाज येतो. त्या नंतर त्याला मंद आचे वर तळावे(2-3मिनिटं).

  5. 5

    तळण झाल्यावर एका कढईत 3 टेबलंस्पून तेल घ्यावे गरम झाल्यावर त्यात 1/2 टिस्पून मोहरी, 1/2 टीस्पून हिंग घालावे आणि गॅस बंद करावा, मग त्यात 2 टेबलस्पून तिखट,1/2 टीस्पून हळद तळलेले मसूर घालून मिक्स करावे.

  6. 6

    नंतर 1 टेबलस्पून काळमीठ, 2 टेबलस्पून पीठीसाखर, 1 टीस्पून सायट्रीक एसीड granules मिक्सर मधून 1 मिनिट फिरवून घ्यावे.(म्हणजे सगळं व्यवस्थीत मिक्स होईल). नंतर हे मसूर मध्ये मिक्स करून घ्यावे. थोडं-थोडं करून यात शेव मिक्स करत जावी. दालमोठ तयार !!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes