बनाना बन्स....मंगलोर स्पेशल (mangalore buns recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#cooksnap पुरी सारखे दिसणारे हे बन्स मी गोवा ,उडुपी आणि मंगलोर ला खाल्ले होते. पण ते घरीही किती छान बनवता येतात हे मला राजेश वेर्णेकर यांची बन्स ची रेसिपी पाहून कळले. राजेश वेर्णेकर यांची ही रेसिपी मी रीक्रीएट केली. नुसत्या चहासोबत सुदधा हे बन्स मस्त लागतात. त्यामुळे मी भाजी न करता चहासोबत खाल्ले. खूपच छान लागले. घरीही खूप आवडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२-३
  1. 1पिकलेले केळे
  2. 3 टीस्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 3 टेबलस्पूनदही
  5. १/८ टीस्पून बेकिंग सोडा
  6. 1 कपगव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    एका बाउल मध्ये केळ कुस्करून घेतलं.त्यात साखर,जीरे,दही घालून छान मिक्स करून घेतलं.त्यात बेकिंग सोडा घातला.

  3. 3

    आता त्या मिश्रणात थोडं थोडं गव्हाचे पीठ घालून पुरीला मळतो तसा आटा मळून तो ३-४ तास फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवला.

  4. 4

    चार तासानंतर आटा छान फुलला होता.त्याचे छोटे गोळे करून, जाडसर पुऱ्या लाटून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घेतल्या.

  5. 5

    पुऱ्या दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर तळल्या.छान टम्म फुगतात. ह्यांना बन्स असे म्हणतात.सगळे बन्स तळून झाले. ते प्लेट मध्ये काढून घेतले.आणि चहासोबत सर्व्ह केले. बटाट्याच्या रस्सा भाजी सोबत पण मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes