गव्हाच्या पिठाचा वेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)

Lockdownमध्ये फेसबुकवर मधुरा रेसिपीज पेजवर अनेक रेसिपी पहात गेले आणि मधुरा म्याम, गितु,दिप्ती,भाग्यश्री ताई,अर्चना,लता काकू,संध्या शिल्पा,ममता, कोमल,सिमा,यासारख्या अनेक मैत्रिणींच्या रेसिपी प्रेझेंटेशन आवडले आणि न केलेले पदार्थ बनवून पाहिले.अनेक वेगळे पदार्थ जमले आणि आता घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसामध्ये मी बरेच पदार्थ सहज , उत्तम, आणि पटकन बनवू लागले.

कुकिंग सूचना
- 1
गव्हाच्या पिठात बेकींग पावडर,खायचा सोडा, चवीपुरते मीठ,एक वाटी कोथिंबीर, दही मिक्स करावे व गरज पडल्यास च पाणी घालावे.पीठ मळून झाल्यावर दोन तीन चमचे तूप घालून पुन्हा मळून पिठ अर्धातास झाकून ठेवावे.
- 2
एकीकडे भाज्या चिरून घ्याव्यात.पनिरचे छोटे छोटे तुकडे करून ते एक चमचा तांदूळ पिठ व एकचमचा बेसन पीठ व चवीनुसार मीठ कोरडे मिक्स करून त्यात पनीर घोळवून तूपावर किंवा तेलावर श्यालोफ्राय करून घ्या व एका स्टीलच्या भांड्यात काढून ठेवावेत.
- 3
एकीकडे कढईत मीठ व एक स्ट्यांड ठेवून व झाकण ठेवून कढई दहा ते पंधरा मिनिटे प्रिहीट करायला ठेवा.
- 4
अर्ध्या तासात पिठ छान फुगते.
- 5
दोन तीन प्लेटला तूप किंवा तेल लावून ग्रीस करून घ्या.
- 6
थोडेसे जाडसर गोळे करून ते ग्रीस करून घेतलेल्या प्लेटमध्ये हाताने थापून घ्या.
- 7
त्या थापलेल्या पिठाला टोचे पाडून घ्या
- 8
त्या टोचे पाडलेल्या पिठावर पिझ्झा Sos किंवा शेजवान सॉस व केचप मिक्स करून एकसारखे पसरवा.
- 9
त्यानंतर किसलेले चिझ पसरवून घ्यावे
- 10
त्यानंतर चिरलेला कोबी, सिमला मिरची, कांदा,टोमॅटो, पनीर, चिली फ्लेक्स,ओरीग्यानो, आणि पुन्हा किसलेले चीज पसरवून घ्यावे.
- 11
तापलेल्या कढईत स्ट्यांडवर ह्या पिझ्झा सेट केलेल्या प्लेट्स ठेवाव्यात व झाकण ठेवून मध्यम आचेवर पिझ्झा २५-३०मिनिटे बेक करून घ्यावा.
- 12
पिझ्झा अधूनमधून चेक करून पहावे.चमच्याला चिकटला नाही की पिझ्झा झाला असे समजावे.
- 13
पिझ्झा बेक झाल्यावर प्लेटमध्ये काढून कटरने किंवा सुरीने कट करून खायला द्यावा.
- 14
पिझ्झा बेकींगची दुसरी पद्धत अशी की तवा तापत ठेवून तव्यावर पिझ्झा सेट केलेली प्लेट ठेवून खोलगट झाकण झाकून बारीक आचेवर अर्धातास पिझ्झा बेक करावा.
- 15
अधूनमधून चेक करून पहावा.
- 16
दोन्ही प्रकारे बेक केलेला पिझ्झा उत्तम होतो.
- 17
अशाप्रकारे घरी बनविलेल्या साजूक तुपाचा गव्हाच्या पिठाचा वेज पिझ्झा अप्रतिम झाला होता..
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)