ऊन्नीयप्पम (unniyappam recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक
#week4
#माझं आवडतं पर्यटन स्थळ
केरळ हे शहर तसं खूप बघण्यासारखं आहे, गेल्याच वर्षी आम्ही केरळची टूर केली होती. माझ्या मिस्टरांचे एक मित्र केरळला मधल्याच त्रिचुर या स्टेशनच्या आसपास राहणारे होते त्यांना जसे समजले की आम्ही केरळला (कोचीन) येणार आहोत तर त्यांनी स्वतः त्रिचुर स्टेशनवर भेटायला येतो म्हणून सांगितले आणि सांगितल्याप्रमाणे आले ते अप्पम व केळ्याचे वेफर्स भेट म्हणून घेऊन आले, अप्पम तर गरम गरमच लागत होते त्यांच्या मिसेजने ते घरून करून पाठवले होते. आणि खाऊन बघितले तर इतकी अप्रतिम चव आणि सॉफ्ट होते. आम्हा सर्वांना ते खूपच आवडले. त्यानंतर मुंबईला आल्यावर माझ्या मिस्टरांना सांगून ठेवले होते नंतर कधी त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांना रेसिपी पाठवायला सांगा म्हणून. पण तो योग काही आला नव्हता, तर आत्ता कूकपॅडच्या या थिममुळे परत आठवण आली आणि त्यांच्याकडून ती रेसिपी मिळवलीच आणि करूनही पाहिली. चवीला छानच झाली एकदम सॉफ्ट झाली. आणि केरळला नारळ भरपूर प्रमाणात त्यामुळे खोबरेल तेलाचा वापर जास्त. मी तिकडून येताना एक बाटली आणली होती खोबरेल तेलाची त्याचाच वापर केला, तर हे अप्पम जरूर करून बघा पण शक्य असल्यास केरळवाला दुकानदार कोणी असेल तर त्यांच्याकडे जो काळा गुळ मिळतो तो घालून करा तसेच केळीसुद्धा त्यांच्याकडचीच घेऊन करा. आणि एक सांगायचं राहिलं ते म्हणजे अप्पमचे पीठ फरमेन्ट होणं जरुरीचं आहे, व्यवस्थित फरमेन्ट नाही झाल तर कडक होतील जसं इडलीचं पीठ तसंच हे आहे. तरच ती अप्रतिम चव तुम्हाला मिळेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
१० जण
  1. ४०० ग्रामतांदूळ २ कप
  2. ३०० ग्राम गुळ (१-१/२ कप)
  3. २५० मिली पाणी (१ कप)
  4. चिमूटभरमीठ
  5. 2 टेबल स्पूनतूप
  6. खोबऱ्याच्या काचऱ्या
  7. 1 टिस्पून वेलचीपूड
  8. १६० ग्राम केळी (५ केळी)
  9. खोबरेल तेल/तूप
  10. चिमुटभरखायचा सोडा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    गुळ बारीक करून घ्या. भांड्यात चिरलेला गुळ व १/२ कप पाणी घालून गुळ विरघळेपर्यंतच गरम करा. ते गुळाचे पाणी गाळणीने गाळून घ्या. बाजूला ठेवा.

  2. 2

    तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात ६-७ तास भिजत ठेवा. नंतर पाणी पूर्णपणे गाळून मिक्सरमध्ये अर्धे तांदूळ व ३ केळी सोलून घाला त्यात १/४ कप पाणी घाला व गुळाचे पाणी अर्धे घाला व बारीक वाटून घ्या. भांड्यात काढा, परत अर्धे राहिलेले तांदूळ, २ केळी, १/४ कप पाणी व राहिलेले अर्धे गुळाचे पाणी घालून वाटून घ्या, भांड्यात काढा.

  3. 3

    त्यात वेलची पूड घाला. एकजीव करून झाकून फेरमेन्ट करण्यासाठी ८ तास उबदार जागी ठेवा. खोबऱ्याचे तुकडे तुपात भाजून घ्या व ते पीठ व्यवस्थित फरमेन्ट झाले की त्यात टाकून मिक्स करा. (पीठ फरमेन्ट झाले नसल्यास उबदार जागी ठेवावे व नंतरच करावे)

  4. 4

    अप्पमच्या भांड्यात खोबरेल तेल घालून त्यात एक एक चमचा मिश्रण टाकून झाकण ठेवून शिजवा. पालटून परत शिजवा नंतर काढून गाळणीत ठेवा म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल. नंतर टिशू पेपरवर ठेवा. सर्व्ह
    करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes