कलिंगडाचो गॉड पॉळो

Pooja M. Pandit
Pooja M. Pandit @pan_poo_

#तांदूळ
कलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो.

कलिंगडाचो गॉड पॉळो

#तांदूळ
कलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३ मिनीटे
  1. २ कप कलिंगडाचा पांढरा गर
  2. १ - १ १/३ कप तांदूळ
  3. २ कप गूळ... गरजेनुसार वापरावा
  4. ३/४ कप जाडे पोहे
  5. १ कप किसलेला ओला नारळ
  6. १/२ हळद
  7. १/४ कप दही
  8. १ १/४ मीठ
  9. १/२ टीस्पून फ्रूट सॉल्ट
  10. तव्यावर लावण्याकरिता तेल
  11. गरजेनुसार साजूक तूप

कुकिंग सूचना

३ मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ चांगले धुऊन, साधारण ६ तास पाण्यात भिजत ठेवा. दुसर्‍या दिवशी साधारण दुप्पट तांदूळ मिळतात.

  2. 2

    नंतर ते निथळून घ्या. पोहे भिजवून पटकन पिळून घ्या. आता हे तांदूळ, पोहे, कलिंगडाचा पांढरा गर व किसलेला ओला नारळ एकत्र करून पाण्याशिवाय गंध वाटून घ्या. गराचा ओलावा वाटायला पुरेसा असतो.

  3. 3

    शेवट ह्यात गरजेनुसार गूळ घालून पुन्हा वाटा व एका पातेल्यात काढून घ्या. त्यात हळद, दही व मीठ घालून एकजीव करा व रात्रभर तिंबवण्यास ठेवून द्या.

  4. 4

    दुसर्‍या दिवशी पीठ फुगून आले पाहिजे. जास्त न फुगल्यास, त्यात वाटल्यास थोडे फ्रूट सॉल्ट घाला व चांगले एकजीव करून घ्या. काही लोक असे करतात, म्हणुन हा पर्याय दिला आहे, मात्र आम्ही असे करत नाही.

  5. 5

    बिडाचा तवा तापवून त्यावर तेल पसरवून घ्या. त्यावर गरजेनुसार थोडे पीठ घाला व हलके पसरवा. डोश्याप्रमाणे खूप पसरवू नका व थोडे जाडसर ठेवा.

  6. 6

    पीठ खूपच घट्ट झालं असल्यास, त्यात गरजेनुसार थोडे पाणी घालून घोटून घ्या व ते तव्यावर ओतता येईल इतपतच पातळ करा. पीठ जरा दाटच ठेवावे, साधारण इडली पीठापेक्षा थोडे पातळ व डोश्याच्या पीठापेक्षा जरा दाट.

  7. 7

    वरुन तूप सोडून झाकण ठेवा व मंद आचेवर २-३ मिनीट शिजवा. पोळ्यावर छान जाळी आली असेल व खालून ही पोळा चांगला भाजला असेल, तर समजा तो तय्यार झाला.

  8. 8

    हा पोळा एकाच बाजूनी भाजावा. तरीही इच्छा असल्यास उलटवून दुसरी बाजू भाजून घ्या.

  9. 9

    हा गरमागरम कलिंगडाचो गॉड पॉळो वर तुपाची मस्त धार सोडून, नाश्त्याला वाढा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja M. Pandit
रोजी
I am a home cook, and I like to cook traditional as well as fusion food. Learnt to cook by trial and error and lots of experiments, reading cook books and watching cooking shows whether Indian or from abroad! I like to be perfect in my work, and the same applies to cooking as well! I have a blog on WordPress.com https://tastyrecipesfrompooja.wordpress.com/ where I share the recipes of my home cooked food!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes