दुधाची झणझणीत आमटी (dudhachi aamti recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

# दूध... 🍼🍼कोल्हापूर भागात दूध उत्पादन असल्याने तिकडे अगदी प्रसिद्ध असलेली ही आमटी अगदी घराघरात हमखास केली जाणारी रेसीपी..... आता दूध थीम मिळाली अन्‌ मग काय विचार केला करून बघितली झणझणीत झाली... 🙏👍👌🤗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 ते 4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध
  2. 2 ते 3 हिरवी मिरची
  3. 1/2 इंच आले
  4. 6 पाकळ्यालसुण
  5. 50 ग्राम ओले खोबरे
  6. 1 चमचा कोथिंबीर
  7. 1/2 टिस्पून हळद
  8. 1/2 टिस्पून मीठ
  9. 1/2 टिस्पून गरम मसाला
  10. 1/2 टिस्पून लाल तिखट
  11. 1/2 टिस्पून कांदा लसूण मसाला

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम अद्रक लसूण, हिरवी मिरची ओलं खोबरं, कोथिंबीर या सगळ्याची पेस्ट करून घ्या. नंतर दूध गरम करून घ्या. ते कोमट हवे.कांदा चिरून घ्या. टीप :- यात बटाटा पण घालु शकतो....

  2. 2

    एका पॅनमध्ये बटर टाकून जिरे हिंग कढीपत्ता टाकून घ्या नंतर त्यामध्ये तयार वाटण घालून चांगले परतून घ्या दोन ते तीन मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला धने जिरे पूड सर्व पावडर मसाले घालून घ्या.

  3. 3

    चांगले परतून झाले की मग त्यात दूध घाला. दोन ते तीन उकळी आल्यानंतर मीठ घालून ढवळून घ्या. एक दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार आहे चविष्ट अशी गरमागरम झणझणीत दूध आमटी.... भात, पोळी सोबत कशीही खाऊ शकतो.... 👍👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes