गोरख ढोकळा (gorakh dhokla recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week8
#नारळी पौर्णिमा रेसिपी 1
ह्या रेसिपी ला काय नाव द्यायचे काही समजत नव्हते. म्हटले हे तुमच्या वर सोडते.
ही रेसिपी तशी मुळ कुठलीच नाही सगळाच जन्गडगुत्था आहे. युरोपियन भागातील ग्रीक परदेशातील अणि थोडा आपला भारतीय पद्धतिनी केलाय... माझ्या मैत्रिणीने हा केलेला पद्धार्थ आहे मी स्वथ: गोड कमी खाणारी असल्या मुळे मला हा आवडला व मी तिच्या कडून ही रेसिपी शिकुन घेतली करायला एकदम सोप्पी..Deepa ताई ला धन्यवाद इतके छान नामकरण करण्या साठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमरवा
  2. 50 ग्रॅमसाखर
  3. 1/2 टीस्पूनईनो
  4. 1 कपनारळचे दुध
  5. 2 टेबलस्पूनसुका मेवा
  6. 6-8केसर काड्या
  7. 50 ग्रॅमखवा
  8. पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम रवा, साखर पाणी घालुन जसे ढोकळ्या साठी भिजवतो तसे भिजवुन दहा मिनिट बाजुला ठेवा. व दहा मिनिटा नी त्यात ईनो घालुन फेटून घेउन एका भाण्ड्यात घेउन कुकर मधे ठेऊन बिना शिट्टी दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्या (जसे ढोकळा सारखे करा)

  2. 2

    दुसरी कडे गैस वर खवा छान गोळा होई पर्यंत परतून घ्या. व बाजुला ठेवा. आत्ता सर्व्ह करते वेळेस प्रथम प्लेट मधे खवा ची लेयर द्या चुरा किंवा थोडे जाडसर थापून पण चालेल.

  3. 3

    आत्ता त्या खवा च्या लेयर वर रवाचा कलेला गोड ढोकळा चे तुकडे करुन त्यावर ठेवा व त्यावर सुका मेवा घाला व वरुन नारळाचे दुध घाला. दुध थोडे जास्तच घाला.ह्याची चव अप्रतीम लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes