मॅगी सूप विथ अर्बन ट्विस्ट (maggi soup recipe in marathi)

Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622

मम्मी बडे़ गजब की भूक लगी,
मॅगी चाहिए मुझे अभी.......
सखींनो आठवलं का काही,

मैत्रीणींनो
आज मी तुमच्या समोर पेश करत आहे......
२ मिनीटात तयार होणारी ( खरं तर २ मिनीटात नाही होत हा....😜😜), गरमागरम, एकदम टेस्टी अशी मॅगी.
हो पण थोड्या हटके अंदाजात.
खरं तर रेसिपी च्या नावा वरूनच तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल.
तर सखींनो चला तर पाहू वेगळ्या ढंगात आणि अंदाजात आपली नेहमीची मॅगी.
( टीप - इथे मी टॉप रेमन मॅगी चा वापर केला आहे. )

मॅगी सूप विथ अर्बन ट्विस्ट (maggi soup recipe in marathi)

मम्मी बडे़ गजब की भूक लगी,
मॅगी चाहिए मुझे अभी.......
सखींनो आठवलं का काही,

मैत्रीणींनो
आज मी तुमच्या समोर पेश करत आहे......
२ मिनीटात तयार होणारी ( खरं तर २ मिनीटात नाही होत हा....😜😜), गरमागरम, एकदम टेस्टी अशी मॅगी.
हो पण थोड्या हटके अंदाजात.
खरं तर रेसिपी च्या नावा वरूनच तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल.
तर सखींनो चला तर पाहू वेगळ्या ढंगात आणि अंदाजात आपली नेहमीची मॅगी.
( टीप - इथे मी टॉप रेमन मॅगी चा वापर केला आहे. )

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
1 सर्विंग
  1. 1टॉप रेमन मॅगी पाकीट विथ टेस्ट मेकर
  2. 3-4बटन मशरूम
  3. 3-4मोठी कोळंबी
  4. 2 वाटीचिकन स्टॉक
  5. 1उकडलेले अंडे
  6. 1 टेबलस्पूनउभा बारीक चिरलेला कांदा
  7. 1 टेबलस्पूनआलं, लसूण बारीक चिरून
  8. 2-3लाल ओल्या मिरच्या
  9. 1 टेबलस्पूनउभा बारीक चिरलेला गाजर
  10. 1/2 टीस्पूनपातीचा कांदा
  11. 1/2 टिस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  13. 1 टेबलस्पूनव्हिनेगर
  14. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  15. 1/2 टिस्पून मीठ
  16. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले आलं, लसूण, कांदा, (वरील प्रमाणाने) ओल्या लाल मिरच्या उभ्या चिरून, उभा बारीक चिरलेला गाजर घालून १ मिनीटभर चांगले परतावे.

  2. 2

    आता त्यात उभे बारीक चिरलेले मशरूम घालून त्यावर सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, टेस्ट मेकर, मीठ घालून चांगले मिक्स करावे. (मीठ १/२ टिस्पूनच घालावे कारण टेस्ट मेकर मध्ये सुद्धा मीठ असते.)

  3. 3

    आता यावर चिकन स्टॉक घालून त्यात रेमन नुडल्स मोडुन घालावे तसेच साफ करून धुऊन घेतलेली २-३ कोळंबी त्यावर घालून छान मिक्स करावे.

  4. 4

    ५ मिनीटात मॅगी तयार होते. मॅगी तयार झाल्यावर एका बाउल मध्ये मॅगी आणि सूप घेऊन त्यावर १/२ टिस्पून पातीचा कांदा आणि १/२ टिस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून. गाजर आणि उभा बारीक चिरलेला थोडासा कांदा ठेवून आणि उकडलेल्या अंड्याचे दोन भाग करून त्या अंड्यावर जरासे मीठ, सोया सॉस घालून सजवावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes