मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

#MaggiMagicInMinutes
#Collab

' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे.

मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)

#MaggiMagicInMinutes
#Collab

' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1पॅकेट मॅगी
  2. 1पाउच मॅगी मसाला
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  5. 1/2शिमला मिरची बारीक चिरून घ्या
  6. 2 टीस्पूनकोथिंबीर
  7. पाणी आवश्यकतेुसार
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  12. 1 कपबेसन
  13. 1/2 कपमैदा
  14. तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मॅगी नूडल्स शिजवून घ्यावे. पातेल्या मध्ये पाणी घेऊन पाण्याला उकळी आली की मॅगी बारीक तुकडे करून त्या मध्ये घालून घ्या.2 ते 3 मिनिटे परतून घ्या आणि मॅगी नूडल्स शिजवून झाले आहेत.

  2. 2

    आता सर्व भाज्या कापून तयार करून घ्या,कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर सगळे बारीक चिरून घ्या,

  3. 3

    आता एका पातेल्यात बेसन आणि मैदा घालून घ्या,त्या मध्ये हळद,बेकिंग पावडर आणि मीठ घालून एकजीव करून घ्या,पाण्याच्या मदतीने पातळ बॅटर बनवून घ्या,त्या मध्ये चिरून ठेवलेल्या भाज्या घालून घ्या.तयार मॅगी नूडल्स घालून घ्या.

  4. 4

    सर्व जिन्नस एकत्र करुन तयार करा.

  5. 5

    आता तडका पात्र गरम करून घ्या.त्या मध्ये तेल घालून गरम करून घ्या,त्या वर तयार मिश्रण एक चमचा घालून बाजूने तेल सोडा,झाकण लावून 2 ते 3 मिनिटे शिजू द्यावे,

  6. 6

    झाकण काढून परतून घ्या आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने पण शिजू द्या.सगळ्या मिश्रण चे असेच fluffy ऑमलेट तयार करून घ्या. टॉमेटो सॉस सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes