पनीर भुर्जी टाकोज (paneer bhurji tacos recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीज
मेक्सिकन खाद्य संस्कृती आणी भारतीय खाद्य संस्कृती जवळपास सारखेच मसाले वापरुन केली जाते. तसे ही काही पद्धार्थ आप्ल्य आवडीवर व चवीवर पण अवलंबून असतात.. जे त्यांना आवडते ते आपल्याला आवडेलच कशाहून. म्हणूनच तर आपण आप्ल्या घरच्यांना आवडणारया चवी जपूनच तसे प्रयोग करतो. तसा हा एक प्रयोग. टाकोज शैल तसे विकत पण मिळतात पण मी यंदा घरी करण्याची हिम्मत केली.. चला तर आज ही रेसिपी मेक्सिको मधे सुर होऊन भारतात कशी संपली ते पाहुया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. टाकोज साठी
  2. 25 ग्रॅममैदा
  3. 75 ग्रॅममका पीठ
  4. 2चिमटी मीठ
  5. 200 ग्रॅमतळण्या साठी तेल
  6. फिल्लींग साठी
  7. 150 ग्रॅमपनीर
  8. 2कांदे बारिक चिरलेला
  9. 2टोमॅटोबारिक चिरलेला
  10. 20 ग्रॅमपत्तागोबी
  11. 20 ग्रॅमबीन्स
  12. 2 टीस्पूनलसुण मिरची पेस्ट
  13. 1 टीस्पूनतिखट
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1 टीस्पूनसाखर
  16. 1 टीस्पूनहिंग
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. 1/2 टीस्पूनधणे जीरे पुड
  19. 1 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    टाकोज बनवण्यासाठी मैदा मका पीठ मीठ एकत्र करुन मळुन घ्या आत्ता त्याचा पोळ्या करतो तितके जाड अणि गोल लाटून घ्या आत्ता डब्ब्याच्या गोल झाकणानी समान आकारा साठी गोल कट करा व फ़ोर्क च्या साह्यानी संपुर्ण पुरी वर टोचे मरुन घ्या आत्ता गरम तेलात तळून घ्या टाळतान्ना दोनी कडा टाकोज (बोटी सारखे) आकार चिमटा व झार्याच्या सहयाने देत टाकोज कडक तळून घ्या.

  2. 2

    प्रथम पत्तागोबी पातळ व लंबी कापुन घ्या.बीन्स तीस सेकंद साठी ब्लँच करुन घ्या व किंचीत तेल मधे थोडे तिखट मीठ घालुन टॉस्स करुन घ्या. कांदा टोमेटो ची कोशिंबीर करतो तशी तेल जीरे हिंग तिखिट घालुन फोडणी द्या व सर्व्हींग च्या वेळेस चवी प्रमाणे मीठ साखर घाला. आत्ता कढईत तेल मोहरी जीरे हिंग लसुण मिरची पेस्ट व कांदा घालुन परता. व किसलेले पनीर घालुन भुर्जी करुन घ्या.

  3. 3

    आत्ता टाकोज ची फिल्लींग करण्याची पद्धत बघू या. प्रथम टाकोज उघडून त्यात थोडी पत्तागोभी घालावी, नंतर बीन्स घालावे,नंतर पनीर भुर्जी घालावी त्यावर कांदा टोमॅटोची कोशिंबिर घाला इथे मी क्रनची चवे साठी चिवडा घातला आहे तुमी हवे तर शेव घालू शकता.

  4. 4

    हे पनीर भुर्जी टाकोज तुम्ही सॉस सोबत किंवा दही घातलेली पूदिना चटनी सोबत सर्व्ह करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes