टेंपुरा चिंगरी/ईबी फ्राय (tempura chingari recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week13

इंटरनेशनलरेसिपीpost1

जापान,आशीया खंडाच्या पूर्व भागातील देशांपैकी नेहमीच चर्चेत असणारा देश म्हणजे जपान होय. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमी काहीतरी क्रांतिकारी आणि उलथापालथ करणारी गोष्ट घडवून आणण्याचा मान ह्या देशाला जातो. उगवत्या सूर्याचा देश म्हणूनही जपानची ख्याती आहे
जपानी माणसांच्या आयुमानाचं रहस्य त्यांच्या खाद्य संस्कृतीत दडलं आहे. खाद्यपदार्थांकडे आरोग्यदायी दृष्टीकोनातून पाहिलं जावं, अशी शिकवण जपानी संस्कृतीत आहे. 'हारा हाची बू' असं जपानमध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ पोट 80% भरेपर्यंत जेवावं, असा होता. विशेष म्हणजे परंपरेतून आलेली ही शिकवण मुलांना लहानपणीच दिली जाते. खाद्यपदार्थ समोरच्या व्यक्तीसमोर कसे ठेवले जातात, याला जपानमध्ये अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जेवण वाढताना विशेष काळजी घेतली जाते. खाद्यपदार्थ एखाद्या व्यक्तीच्या समोर मांडताना त्याच्या ते डोळ्याला सुखावतील, हे पाहिलं जातं. खाद्यपदार्थ पोटात जाण्याआधी ते पाहूनच तुमची ज्ञानेंद्रियं जागृत होतील, याबद्दल जपानी मंडळी अतिशय दक्ष असतात. त्यामुळे हे पदार्थ खाताना फक्त पोट न भरता, त्याचा 'फिल' घेता येतो.  
टेंपुरा चिंगारी किंवा टेंपुरा ईबीह्या नावाने प्रसिद्ध असलेला पदार्थ मत्स्यप्रेमीचा नेहमी च आकर्षण चा पदार्थ.चिंगारी किंवा उभी किंवा श्रीम्प म्हणजे काय तर आपल्या लाडक्या कोंलंबीचीच जापान मधील नावे आमी टेंपुरा म्हणजे दुसरे तिसरे विशेष काहीही नसुन तो पदार्थ तयार करण्याची पद्धत जसे आपण उकडून, वाफवून, भाजून व तळून पदार्थ तयार करतो. मग येथिल बोलीभाषेतील टेंपुरा म्हणजे तळणे किंवा फ्राय करणे.
चला तर आज थोडी जपानची सैर करुया आणि तेथील टेंपुरा चिंगारी चा आस्वाद घेऊया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. ५०० ग्राम टायगर प्रोन्स
  2. 1 कपतांदळाचे पीठ/मैदा
  3. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  4. १टेबलस्पून मीरे पूड
  5. 1लिंबाचा रस
  6. 1 टीस्पूनओरीगानो
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टेबलस्पूनगार्लिक पावडर
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 कपब्रेड क्रम्स्स
  11. 2अंडी

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मोठी कोलंबी स्वच्छ साफ करून धुऊन घ्या.कोलंबीला एका बाजूने कट देऊन त्यातील काळा धागा काढून टाका.

  2. 2

    आता कोलंबीला दुसऱ्या बाजूने ही थोड्या थोड्या अंतरावर आडवे काप द्या.(दोन तुकडे करायचे नाहीत) असे कट दिल्याने कोलंबी गोल होणार नाही सरळच राहील व साईज मोठी वाटते.

  3. 3

    आता ह्या कोलंबी ला लिंबाचा रस,मीठ व मीरे पूड लावून १० मिनिटे मेरिनेट करा.

  4. 4

    आता एका बाऊल मध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात लाल मिरची पावडर, मिरेपूड, गार्लिक पावडर, ओरिगानो, गरम मसाला व मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता तयार केलेल्या तांदळाच्या पीठाच्या मिश्रणात कोलंबीला घोळवून घ्या. म्हणजे कोलंबीला व्यवस्थित कोटिंग होईल असे सर्व कोलंबीला तांदळाच्या पीठाचे कोटींग करून घ्या

  6. 6

    एका बाऊलमध्ये दोन अंडी फोडून चमच्याने फेटून घ्या. तांदळाच्या पिठातील कोटींग केलेली कोलंबी आता फेटून घेतलेल्या अंड्यामध्ये घालून मग तयार केलेल्या ब्रेडक्रम्स मध्ये व्यवस्थित कोट करून घ्या.

  7. 7

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात तयार करून घेतलेली ब्रेडक्रम्स मध्ये कोटिंग केलेली सर्व कोलंबी तळून घ्या.

  8. 8

    आता टेंपुरा चिंगारी/फ्राईड श्रिम्प स्टारटर म्हणून सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.टोमेटो सॉस किंवा मेयोनिज किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes