रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week 12

कचोरी हा एक राजस्थान चा खाद्यपदार्थ आहे तसा हा सर्वञ मिळतो पण माझ्या आठवणीतील रतलाम रेल्वे स्टेशन जवळ खुपच छान अशी मिळते ती कधी तुम्ही गेलात तर नक्कीच ट्राय करा अप्रतिम चव आहे तिथली रतलामी शेव देखील प्रसिद्ध आहे छान आठवण करून देत असते मला ही कचोरी माझे वडील कचोरी करण्यात माहीर आहेत अनेक वेगवेगळे पदार्थ ते तयार करण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्याकडूनच शिकली आहे म्हणून मी हा प्रकार करत असते नेहमीच कशी झाली आहे झाली ना ईच्छा कचोरी खाण्याची

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅम मैदा
  2. 4 टेबल स्पूनतेल
  3. 1 कपपाणी
  4. 50 ग्रॅम मुगदाळ
  5. 2 टेबल स्पूनबेसन
  6. 1 टेबलस्पूनधना
  7. 1 टेबल स्पूनबडीशेप
  8. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 1जीरे पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मैदा मीठ व तेल घालून एकजीव करून त्यात पाणी घालून पीठ मळून घ्यावे चपाती साठी मळतो तसे (मोहन चेक करणे म्हणजे त्याची मुठ तयार करून बघणे).

  2. 2

    मुगदाळ शिजवून घ्या तेल गरम करून त्यात बेसन घालून परतून झाल्यावर शिजवलेली डाळ घाला व खाली दाखवलेल्या प्रमाणे सर्व मसाले घालून परतून घ्यावे.

  3. 3

    डाळ शिजली की त्यात आमचूर पावडर व धने पूड घालून मिक्स केले सारण तयार झाले थोडे कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे.

  4. 4

    मैद्याची पारी करून हाताच्या तळव्यावर प्रेस करून घेतली सारणाचा गोळा तयार केला.

  5. 5

    पारी मध्ये सारणा चा गोळा ठेवून दाखवल्या प्रमाणे रोल केला.

  6. 6

    तो रोल तळव्यावर प्रेस करत पुरी चा आकार देऊन तयार केले सर्व कचोरी रेडी केल्या

  7. 7

    तेल हलके गरम करून त्यात कचोरी सोडून मंद आचेवर तळू घ्यावेत त्या हळूहळू वर येतात टम्म फुगतात

  8. 8

    पलटी मारून पुन्हा खरपूस रंग येईपर्यंत तळावे व गरमागरम गोड दही शेव अनार घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

Similar Recipes