चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी (chicken parmesan / chilli garlic spaghetti recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week13

इंटरनेशनलरेसिपीpost2

कुकपेड मराठीचे खरच मनापासून धन्यवाद कारण कुकपेडकडून मिळालेली इंटरनेशनल रेसिपी थीम आली तेव्हा थोडी मी विचारात पडले की आपल्या ला इंटरनेशनल रेसिपी करायला जमेल का पण लगेच मनाने मला साथ दिली की नक्कीच इंटरनेशनल रेसिपी ही छानच जमणार.

चिकन परमेसन ही ओरीजीन २०व्या शतकातील इटालीयन डीश. नॉर्थ अमेरिका,कॅनेडा, ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणच्या रेस्टॉरंट मध्ये इटालीयन अमेरीकन कयुसीन म्हणून सर्व्ह होऊ लागले.

चिकन परमेसन हया डिश बद्द्ल सांगायचे तर परमेसन हा एक चिझ चा प्रकार आहे.आपल्या कडे जसे चिझ् स्प्रेड ,चिझ् स्लाईस्,मोझरेला चिझ् तसेच तिथे मोझ्ररेला,परमेसन व प्रोवोलन हे चिझ चे प्रकार.

माझ्या लाडक्या मुलाला देखील क्रिमी व चिंझी् पदार्थ खूप खूप आवडतात आज खास त्याच्यासाठीच ही चिकन परमेसन म्हणजेच चिकन ब्रेस्ट कोटेड वीथ ब्रेड क्रम्स इन टॉमेटो सॉस विथ चिझ्.

चला तर मग पाहूया चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी ची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास ३० मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 2चिकन ब्रेस्ट
  2. 2 कपब्रेड क्रम्स
  3. 2 टेबलस्पूनओरीगानो
  4. 1/2 कपतांदळाचे पीठ/मैदा
  5. 2अंडी
  6. गरजेनुसार तेल
  7. 2 कपइटालियन मरीनारा सॉस
  8. १०० ग्रॅम मॉझरेला चीज
  9. 1 टेबलस्पूनचिली पावडर
  10. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  11. मरीनारा सॉस तयार करण्यासाठी
  12. ५०० ग्रॅम चॅरी टॉमेटो
  13. 2कांदे
  14. १०-१२ लसूण पाकळ्या
  15. 1 टेबलस्पूनविनीगर
  16. 1 टेबलस्पूनऑरीगानो
  17. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  18. 2 टेबलस्पूनमीरे पावडर
  19. चवीनुसार मीठ
  20. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१ तास ३० मिनिटे
  1. 1

    चिकन परमेसन तयार करण्यासाठी आवश्यक मरीनारा सॉस तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला लसूण घाला.

  2. 2

    आता त्यात मिरची पावडर व चिरलेले टोमॅटो घाला व थोडे परतून घ्या.

  3. 3

    टोमॅटो थोडा शिजून नरम झाला की त्यात मीरे पूड,विनीगर, टॉमेटो सॉस व मीठ घालून सर्व एकत्र करून घ्या.

  4. 4

    सर्व व्यवस्थित मिक्स करून आता त्यात ऑरीगानो घाला व नरम होईपर्यंत शिजवून घ्या.(मोठे टॉमेटो वापरले तर तयार केलेला मरीनारा सॉस मिक्सर मध्ये फिरवून घ्या)

  5. 5

    आता चिकन ब्रेस्ट चे पीस मधून पात्तळ कापून घ्या म्हणजे त्यांचे ४ भाग होतील.त्याला मीठ,लिंबाचा रस व मिरेपूड घालून १० मिनिटे मेरीनेट करून घ्या.

  6. 6

    तांदळाच्या पिठात मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, ऑरीगनो घालून मिक्स करुन घ्या.

  7. 7

    एका बाउल मध्ये दोन अंडी फोडून मीठ घाला व बिट करून घ्या.

  8. 8

    एका डिश मध्ये ब्रेड क्रम्स काढून घ्या

  9. 9

    आता मेरीनेट केलेले चिकन ब्रेस्ट चे पीस प्रथम तांदळाच्या पीठात घोळवून,अंड्यात डीप करा व शेवटी ब्रेड क्रम्स मघे कोट करून घ्या.ह्या प्रमाणे सर्व कोट करून घ्या.

  10. 10

    आता पॅन मध्ये थोडे तेल घालून त्यात कोट करून घेतलेले चिकन ब्रेस्ट चे पीस शेलो पर्याय करून गोल्डन रंगावर पर्याय करून घ्या.

  11. 11

    आता चिकन परमेसन असे्मबल करण्यासाठी माईक्रोवेव सेफ टिन मध्ये आपण तयार केलेला मरीनारा सॉस खाली बोट्मला पसरवून घ्या त्यावर पर्याय केलेले चिकन ब्रेस्टचे पिस व वरती पुन्हा मरीनारा सॉस ने कंवर करा.

  12. 12

    आता त्या वरुन मोझरेला चिझ किसून घाला.त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला

  13. 13

    मायक्रोवेव्ह किंवा OTG मघे १८०° लाल १५-२० मिनिटे बेक करा.

  14. 14

    एका पॅनमध्ये तेल,कांदा व बारीक लसूण परतून त्यावर बॉईल केलेली स्पगेटी घाला व थोडे परतून घ्या.आता तयार झालेल्या स्पगेटी बरोबर तयार झालेले चिकन परमेसन चे पीस सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes