ओअट्स अळूवडी (oats aluvadi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week14
अळूवडी आणी बर्फी रेसिपीज
अळू ही अशी भाजी आहे जीची मुळे, देठ, व पाने जवळपास सगळाच भाग वापरू शकतो. अळू आजकाल बाराही महिने मिळतो पण महालक्ष्मी मधे ह्याला फार महत्व. परंपरे नी चालत आले आहे ते पण ब्लड प्रेशर, सांधे दुखी कण्ट्रोल करतात व वजन पण कमी करण्यास मदत करतात. अळूवडी करण्याची प्रत्येकाची पद्धत जवळ पास सारखीच आस्ते. बेसन हा मुख्य घटक असतो पण आज मी बेसन न घालता ओट्स घलणार आहे. करण मला स्वथ्हाला बेसनाचे पथ्य आहे म्हणून हा प्रयोग.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2-3 व्यक्ती
  1. 60 ग्रॅममसाला ओअट्स
  2. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनधणे जीरे पुड
  6. 1/2 टीस्पूनमिठ
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 2 टीस्पूनईम्ली चटनी
  9. 10-15अळूची पानं
  10. 10 ग्रॅमचिंच पाण्यात भिजवलेली
  11. पाणी
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम ओअट्स मिक्सर मधे फिरवून पावडर करुन घ्या. एका बाउल मधे ओअट्स पावडर घेउन त्यात तिखट,हळद,मीठ,धणे जीरे पूड,हिंग घाला व पाण्यानी मिक्स करुन घ्या व थोडे पाणी जास्तच घालुन दहा मिनिटे बाजुला ठेवा.

  2. 2

    आत्ता फोटो मधे दाखवल्या प्रमाणे पानांची देठे काढुन घेउन पानांच्या ज्या जाड वेईन्स आहे त्या चाकू च्या सह्यनी काढुन घ्या आत्ता चिंचे चे पाने घेउन्त्यत पाने बुडवून धून घ्या व किचन नप्कीन नी अलगद पुसुन घ्य(हे सगळे अगदी हलक्या हातानी करावे अळू ची पाने नाजूक असतात). ओअट्स चे मिश्रण आत्ता फुलले असेल त्यात ईम्ली चटनी टाकून मिक्स करा.

  3. 3

    आत्ता किचन प्लेटफॉर्म वर उलट्या साइड नी पान ठेवा व त्यावर ओअट्स चे भिजवलेले मिश्रण हलक्या हातानी संभाळून लावा नाहितर पाने तुटण्याची शक्यता असते. मग त्या वर दुसरे पान ठेऊन पुन्हा ओअट्स मिश्रण लावावे असे पाच ते सहा पानांसाठी करावे व त्याच एक रोल करावा.आत्ता हा रोल स्टीमर मधे वीस ते पंचवीस मिनिटे वाफवून घ्यावेत. व थंड करण्यास ठेवावे.

  4. 4

    एका कढईत तेल गरम करण्यास ठेवणे व थंड झालेल्या रोल चे अर्धा सेंटीमीटर इतक्या जाडीच्या वड्या कापुन तळून घ्यावे. खुसखुशीत ओअट्स अळूवडी तैयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes