नारळाच्या शिरातली / दुधातील अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#रेसिपीबुक
#week14

प्राणी, पक्षी, फळे, फुले यांचे जसे राजे मानले जातात तसे वडी पदार्थांची राणी म्हणजे अळूवडी मानली जाईल. त्यातही 'नारळाच्या दुधातली अळूवडी' म्हणजे जणू सिंहासनावर बसलेली महाराणीच. अळूचा जन्म कंदमुळाच्या वंशातील आहे. वडीच्या अळूच्या पाठीवर, भाजीचा अळू आणि शोभेचा अळू अशी आणखी दोन भावंडे. पण जेष्ठतेनुसार राजगादी वडीच्या अळूकडे आली आहे. अळूवडीने त्या गादीचा मान सर्वतोपरी राखला आहे. आग्नेय आशियातील आपले साम्राज्य विस्तारत आता जवळपास संपुर्ण आशिया व आफ्रिकेच्या बहुतांश भागात पसरले आहे. अर्थात या साम्राज्य विस्तारात अळूवडीला मानणारी प्रजा, म्हणजे घरोघरीच्या गृहिणींचा मोठा वाटा आहे. पिढी-दर-पिढी या रेसिपी घराघरांतून जपल्या गेल्या आहेत.

प्रत्येक पदार्थाची एक ओळख, एक डिग्निटी असते. अळूवडीच्या बाबतीत या डिग्निटीला धक्का लावण्याचा प्रयत्न काही दुकानांमधून होतो. अनेकदा काही ढोकळा, जिलेबी, समोसा विकणाऱ्या दुकानांतून अळूवडी सदृष्य पदार्थ विकला जातो. पारंपारिक पद्धतीने बनविलेली अळूवडी ही खरी चलनी नोट मानली तर या दुकानांतून मिळणारी अळूवडी म्हणजे 'भारतीय बच्चोका बँक' या नावाने मिळणाऱ्या खेळण्यातील नोटांसारखी असते. अळूवडीची डिग्निटी सांभाळायची, तिचा आब राखायचा तर ती पारंपारिक पद्धतीने बनवून, एखाद्या खास जेवणाच्या ताटात विराजमान व्हायला हवी. आपल्याला लक्षात ठेवायला हवे, ती महाराणी आहे!

अळूची पाने बाराही महिने उपलब्ध असतात. भाजीचा अळू वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने भाजी म्हणून खाल्ला जातो. अळूच्या कंदाला उपवासाच्या पदार्थांत मान आहे. पण खरी सेलिब्रिटी असते ती अर्थातच आपली अळूवडी. नारळाच्या दुधाच्या राज्यासनावर विराजमान झालेली समस्त वड्यांची महाराणी 'अळूवडी'!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिनिटे
7-8 सर्विंग
  1. अळूची पाने
  2. 2 कपबेसन
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1 वाटीकिसलेला ओला नारळ
  5. 1 आणि 1/2 कप नारळाचे दूध
  6. 3-4हिरव्या मिरच्या
  7. 5-6लसूण पाकळ्या
  8. 1 इंचआल्याचा तुकडा
  9. 1 टीस्पूनधणे पूड
  10. 1/२ टीस्पून हळद
  11. 1 आणि 1/2 टीस्पून लाल मिरची पूड
  12. 1 आणि 1/2 टीस्पून गरम मसाला
  13. 1/4 टीस्पूनहिंग
  14. 1/4 कपचिंचेचा जाडसर कोळ
  15. 3 टेबलस्पूनगूळ
  16. चवीनुसार मीठ
  17. 1 टेबलस्पूनमोहरी (फोडणीसाठी)

कुकिंग सूचना

३०-४० मिनिटे
  1. 1

    अळूची पाने चांगली स्वच्छ धुवून त्याचे देठ व शिरा काढून घ्यावे. अळूच्या पानाच्या मागच्या बाजूला लाटणे फिरवून घ्यावे. किसलेला ओला नारळ मिक्सर मध्ये वाटून घेऊन त्याचे दुध काढून घ्यावे.

  2. 2

    आता नारळ,लसूण पाकळ्या, मिरची, आले व कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घ्यावे. एका भांड्यात बेसन, तांदळाचे पिठ, नारळ,मिरच्या,लसूण,आले, कोथिंबीर याची पेस्ट, गूळ, चिंचेचा कोळ, धणे पावडर, गरम मसाला, हळद, लाल मिरची पूड,मीठ हे सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात गरजेनुसार पाणी घालून सरसरीत पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    आता एक अळूचे पान घेऊन त्यावर पीठ चित्रात दाखवल्याप्रमाणे समान पसरवून लावावे, मग त्यावर दुसरे पान उलट ठेऊन पीठ लावून घ्यावे, अशाप्रकारे सर्व पाने लावून झाल्यावर त्या ५-६ पानांचा घट्ट रोल करावा.

  4. 4

    आता अळूच्या कच्च्या रोलचे तुकडे करून घ्यावे. एका pan मध्ये भांड्यात तेल घेऊन मोहरीची फोडणी द्यावी. या फोडणीवर आधी तयार केलेल्या अळूच्या कच्च्या रोलचे तुकडे रचून घ्यावे. एका बाजूने छान शिजल्यावर परतून घ्यावे आणि नंतर वरून प्रत्येक वडीवर आणि नंतर बाजूला असे नारळाचे दूध घालावे. pan वर झाकण ठेवून १०-१२ मिनिटे वड्या नारळाच्या दुधात शिजवून घ्याव्यात.

  5. 5

    नारळाचे दूध यामध्ये पूर्ण आटून अळूवडीमध्ये शोषले गेल्यामुळे वडी छान ज्युसी होते. गरमागरम नारळाच्या शिरातली (दुधातील) अळूवडी तय्यार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes