चीझ स्टफड् बटाटावडा (batata vada recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

चीझ स्टफड् बटाटावडा (batata vada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 5मोठे बटाटे (उकडलेले)
  2. 2 वाट्याबेसन
  3. 2-3हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेेल्या)
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर (बारीक चिरलेली)
  5. 1 टेबलस्पूनआले लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
  6. 5-6कडीपत्ता
  7. 1 टीस्पूनहळद पावडर
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1 टीस्पूनजिरे
  10. 1 टीस्पूनउडीद डाळ (धुऊन घेतलेली)
  11. 2 टीस्पूनतांदळाचे पीठ
  12. 3-4चीझ क्यूब्स (लहान चौकोनी तुकडे करून)
  13. तळण्यासाठी तेल
  14. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे स्वच्छ धुवून पाण्यात थोडे मीठ घालून उकडवून घ्यावे. थंड झाल्यावर साले काढून बटाटे कुस्करून घ्यावेत. चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. चीझ क्यूबचे लहान चौकोनी तुकडे करून घ्यावेत

  2. 2

    आता बटाटावड्याची भाजी करण्यासाठी प्रथम एका कढईमध्ये तेल घ्यावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालावे. आता त्यात कडीपत्ता, मिरची, आले लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, हळद, थोडीशी कोथिंबीर व मीठ फोडणीत घालावे. कुस्करलेले बटाटे फोडणीत घालून व्यवस्थित मिक्स करावे. वरून भरपूर कोथिंबीर घालून नीट एकजीव करून घ्यावे व मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे. भाजी थंड झाल्यावर मिश्रणाचे चपटे गोळे करून घ्यावे. त्यात लहान तुकडे केलेले चीझ स्टफ करून घ्यावे.

  3. 3

    आता एका भांड्यात बेसन, हळद व चवीनुसार मीठ, घालून पाणी घालून चांगले मिसळून घ्यावे. त्यात कडकडीत गरम तेलाचे मोहन घालून चांगले फेटावे, जेणेकरून पीठ थोडे हलके होते. कढईत वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. तयार बटाट्याचे गोळे बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवून तेलात तळून काढावे. चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम बटाटा वडा तय्यार! मिरची व कांद्यासोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या (2)

Similar Recipes