रशियन चिकन चीझ कटलेट (Russian Chicken Cheese Cutlet recipe in marathi)

Parvin Pathan
Parvin Pathan @cook_24216423
Pune

रशियन चिकन चीझ कटलेट (Russian Chicken Cheese Cutlet recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दीड तास
  1. २५० ग्रॅम चिकन
  2. 4बटाटे
  3. 2कांदे
  4. 4 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  5. 2 टीस्पूनबटर
  6. 1/2 वाटीकोथिंबीर
  7. 1/2 वाटीपुदिना
  8. 2 टीस्पूनसोया सॉस
  9. 2 टीस्पूनचिली सॉस
  10. 4हिरवी मिरची
  11. 2छोटे क्यूब चीझ
  12. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  13. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  14. अंडे
  15. पॅकेट बारीक शेवया
  16. मीठ चवीनुसार
  17. तेल तळण्यासाठी
  18. १ वाटी किसलेले गाजर
  19. १/२ वाटी कट केलेल शिमला मिरची

कुकिंग सूचना

दीड तास
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक छोटा कांदा टाकून परतावा. नंतर त्यात आले लसूण पेस्ट व धने पावडर टाका व परता. नंतर त्यात चिकन टाकून १० मिनिटे शिजवून घ्या. शिजण्यासाठी पाणी टाकू नये.

  2. 2

    आता शिजलेले चिकन मिक्सर ला वाटून घ्या. बटाटे शिजवून मॅश करा,किसलेले गाजर, कोथिंबीर पुदिना, सोया सॉस, चीली सॉस, आले लसूण पेस्ट,कट केलेली शिमला मिरची,चाट मसाला, वाटलेली मिरची पेस्ट,किसलेले चीझ,लाल मिरची पावडर. हे सर्व घटक चिकन मध्ये मिक्स करून मळून घ्या.

  3. 3

    आता मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला राऊंड शेप द्या. आता त्याला आधी फेटलेल्या अंड्यात व नंतर शेवया मध्ये डीप करा. सर्व कटलेट अंडे व शेवया लाऊन तयार करा a १५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. नंतर तेल गरम करून घ्या आणि त्यात कटलेट १०मिनिटे डीप फ्राय करा. क्रिस्पी कटलेट खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Parvin Pathan
Parvin Pathan @cook_24216423
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes