ज्वारी-बदाम नानखटाई (jwari badam nankhatai recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#नानखटाई #सप्टेंबर
४०८ वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. सन १६१२ मधली. व्यापाराच्या मुखवट्याखाली आपले वसाहतवादी मनसुबे घेऊन आलेल्या पोर्तुगीज आणि ब्रिटिशांमधे लढाई होऊन पोर्तुगीजांनी आपला 'सुरत' शहरावरचा ताबा गमावला. आपल्या सोईसाठी बनवलेल्या अनेक गोष्टी इतर व्यापाऱ्यांना विकून ते निघून गेले. या पराभवानंतर सुरत मधील एक पारंपारीक पोर्तुगीज बेकरी एका इराणी व्यापाऱ्याने घेतली. पण त्याच्या बेकरीतले पाव काही स्थानिकांना पसंत पडेना. तो पारसी बाबा सुकलेले, कडक झालेले पाव अगदि कमी किमतीत लोकांना विकू लागला. हे कडक पाव मात्र लोकांना भलतेच आवडले. पुढे हा व्यापारी पाव बनवल्यावर त्यांना खास सुकवून विकत असे. या पावासोबत त्याने बरेच प्रयोग केले आणि त्याला ही जबरदस्त रेसिपी सापडली. हुशार बाबाजीने आपल्या मूळ भाषेत ब्रेड साठी वापरला जाणारा शब्द 'नान' आणि पूर्व पर्शिया किंवा आताच्या अफगाणिस्तानात बिस्किटासाठी वापरला जाणारा शब्द 'खटाई' जोडून या रेसिपीला नाव दिले 'नानखटाई'. पोर्तुगीज, इंग्रज देश सोडून गेले, पण पारसी समाज आपल्या देशात दुधात साखर मिसळावी तसा मिसळून गेला. या वसाहतवादी आणि साम्राज्यवादी शक्तींच्या लढाईत एक जबरदस्त रेसिपी आपल्या हाती आली.'नानखटाई' दिसायला सोपी असली तरी बनवताना भल्या भल्यांना चकमा देऊ शकते. पदार्थांचे प्रमाण, त्यांच्या मिश्रणाचा क्रम, तापमान, बनविण्यासाठी लागणारा वेळ यातील एखादी जरी गोष्ट चुकली तरी गडबड झालीच म्हणून समजावे. थोडासा अनुभव गाठीशी असला तरी थोडी उत्सुकता आणि थोडे धाडस करुन ज्वारी आणि बदाम वापरुन नानखटाईचा हा प्रयोग केला. अन्नपुर्णेच्या कृपेने प्रयोग भलताच यशस्वी झाला. नानखटाईची ही रेसिपी सर्वांसोबत शेअर करते आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५-५० मिनिटे
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1 कपगव्हाचे पीठ
  3. 1/4 कपबदाम पूड
  4. 1 कपतूप
  5. 1 कपपिठीसाखर
  6. 2 टेबलस्पूनरवा
  7. 1 टिस्पून दालचिनी पूड
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  9. 1 टेबलस्पूनआवश्यकतेनुसार बदाम तुकडे
  10. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

४५-५० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांडयात तुप घेऊन त्यात पिठी साखर घालून ते मिश्रण चांगले फेटून घ्यावे. मिश्रण थोडे हलके होते. यामुळे नानखटाई खुसखुशीत होते.

  2. 2

    आता त्यात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बदाम पूड, रवा, दालचिनी पूड, बेकिंग पावडर व चिमुटभर मीठ घालून व्यवस्थित हाताने मळून घ्यावे. त्याचे लहान गोळे करून थोडे दाबून घ्यावे. त्याला सुरीने क्रॉस करून घ्यावे व आवडत असल्यास त्यावर बदामाचे तुकडे लावावेत.

  3. 3

    एका टोपाला १० मिनिटे प्रिहीट करून घ्यावे. बेकिंग पॅन ला तुपाने ग्रीसिंग करून घ्यावे. त्यात तयार नानखटाई ठेवाव्या. बेकिंग टोपात ठेवून १०-१२ मिनिटे मध्यम आचेवर बेक करून घ्यावे. बेक झाल्यावर थोडे थंड करून घ्यावे. आणि चहाबरोबर सर्व्ह करावे मस्त पौष्टिक, खुसखुशीत ज्वारी-बदाम नानखटाई.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes