झणझणीत चटकदार मिसळपाव (misalpav recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#ks2
#पश्चिम #महाराष्ट्र
मिसळ पाव लोकप्रिय महाराष्ट्रीयन नाश्ता आहे. मिसळ पाव मध्ये बरेच बदल आहेत. .मिसळ ही लोकप्रिय रेसिपी आहे. मुंबई ची मिसळ, पुणेरी मिसळ ,नाशिक ची मिसळ , कोल्हापूरी मिसळ, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते.झणझणीत मिसळपाव पाहून सगळ्याच्यांच तोंडाला पाणी सुटत.…. पोटभरीचे व पौष्टीक नाष्टा किंवा एकवेळच जेवणच म्हणता येईल अशी मिसळपाव लहानथोर सगळ्यांच्या आवडीचा मेनू .व्यक्ती तितक्या प्रकृती.. प्रत्येकाच्या मनातील मिसळीची संकल्पना वेगवेगळी असते.मी मिसळ मटकी आणि सफेद वाटाणे दोन्ही ची बनवते..
मिसळ म्हणजे मस्त तर्रीदार मटकीचा किंवा सफेद वाटण्याचा चविष्ट रस्सा.. फरसाण, त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर, लिंबू आणी मऊ लुसलूसीत पाव.. मन एकदम प्रसन्न...मिसळीला झणझणीत.. तर्रीदार चमचमीत, तिखटजाळकिती तरी उपमा दिल्या तरी कमीच आहेत.
प्रांतानुसार चवित बदल होणार हा पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 250ग्रॅम मोड आलेली मटकी
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 4कांदे बारीक चिरलेले
  4. 2टोमॅटो बारीक चिरलेले
  5. 1टेबलस्पून कांदालसूण मसाला
  6. 3टेबलस्पून मिसळ मसाला(घरी बनवलेला)
  7. 1टेबलस्पून आलेलसूण पेस्ट
  8. पाणी उकळलेले आवश्यकतेनुसार
  9. गुळ आवडीनुसार
  10. 2टेबलस्पून कोथिंबीर
  11. 4टेबलस्पून तेल
  12. मिक्स फरसाण गरजेनुसार
  13. 2लादी पाव
  14. 1लिंबू
  15. 1टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर
  16. 1टीस्पून हळद
  17. 7ते 8 कडीपत्ता पाने
  18. 1/2टीस्पून हिंग

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    मटकी 8 ते 10 तास पाण्यात भिजत घालावी.त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड आणावेत. कुकरमध्ये मोड आलेली मटकी घ्या. पाणी जरा जास्तच घालायचं ह्यामध्ये पूर्ण मटकीची चव उतरते.मटकीसोबतच बटाटा उकडवून घ्यायचा. पाणी, हळद आणि मीठ घाला.1 शिटी पर्यंत मध्यम आचेवर शिजवा. मटाकीला खूप जास्त शिजवू नका.

  2. 2

    कढईत तेल गरम करुन कडीपत्ताआणि हिंग घालून फोडणी करावी. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या.ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.मिश्रण एकजीव झाले की आलेलसूण पेस्ट, कांदालसूण मसाला, घरी बनवलेला मिसळ मसाला, काश्मिरी मिरची पावडर, उकडलेला बटाटा किसून घालून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर छान शिजू द्या.शिजवलेली मटकी, उकळलेले पाणी, थोडा गूळ,मीठ गरजेनुसार घालावे. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून मध्यम आचेवर 10 मिनिटे उकळवून घ्यावे. वरून कोथिंबीर घालावी.

  3. 3

    गॅस बंद करा आणि मिसळीचा कट तयार आहे.सर्व्ह करताना एका भांड्यात तळाशी मटाकीचा एक थर घाला. वरून फरसाण पेरून घ्या. कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.मिसळ तयार आहे. फरसाण, कांदा, लिंबु पेरून गरमागरम सर्व्ह करा. सोबत पाव आठवणीने द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes