झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊
झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!
मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…
अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच.

झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊
झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!
मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…
अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1 कपमोड आलेली मटकी
  2. 1/2 कपसुके खोबरे
  3. 1कांदा उभा चिरलेला
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. 1-1/2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 2 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  8. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 7-8कडीपत्याची पाने
  13. 2तमालपत्र
  14. मीठ चवीनुसार
  15. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  16. 1 कपबा. चिरलेला टोमॅटो
  17. 1 टीस्पूनमोहरी
  18. 3 कपगरम पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सुके खोबरे, उभा चिरलेला कांदा आणि लसूण थोड्याशा तेलावर भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. भांड्यात तेल गरम करून मोहरी टाका ती तडतडली की कडीपत्ता, तमालपत्र आणि नंतर कांदा टाकुन गोल्डन होईपर्यंत परतवून घ्या.

  2. 2

    टोमॅटो टाकून तो नरम होईपर्यंत परतवा. मग सगळे मसाले आणि पेस्ट टाकून 2-3 मिनिटे लो फ्लेम वर ढवळा. तयार वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.

  3. 3

    गरम पाणी आणि मटकी टाकून 15 मिनिटे छान उकळत ठेवा मटकी शिजल्यावर मीठ टाका.
    प्लेट मध्ये मिसळ त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून पावसोबत आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes