मिसळपाव (misalpav recipe in marathi)

#रेसिपीबुक Post 2 रेसिपी बुक साठी गोडाने सुरुवात केली. म्हणून गोडानंतर काही झणझणीत आणि चमचमीत हवंच. म्हणून आजची ही मिसळ पाव थाली मिसळ. हा पदार्थ क्वचितच कुणाला आवडत नसेल आणि नाशिकच्या लोकांचा मिसळ म्हणजे जीव की प्राण.. आणि मी ही नाशिकची असल्यामुळे अर्थातच मी ही यात तूसभर मागे नाही.. मी ही तितकीच मिसळपाववर ताव मारणारी.. आणि घरी केलेल्या गरमागरम मिसळपाववर ताव मारायची मजाही काही वेगळीच..
मिसळपाव (misalpav recipe in marathi)
#रेसिपीबुक Post 2 रेसिपी बुक साठी गोडाने सुरुवात केली. म्हणून गोडानंतर काही झणझणीत आणि चमचमीत हवंच. म्हणून आजची ही मिसळ पाव थाली मिसळ. हा पदार्थ क्वचितच कुणाला आवडत नसेल आणि नाशिकच्या लोकांचा मिसळ म्हणजे जीव की प्राण.. आणि मी ही नाशिकची असल्यामुळे अर्थातच मी ही यात तूसभर मागे नाही.. मी ही तितकीच मिसळपाववर ताव मारणारी.. आणि घरी केलेल्या गरमागरम मिसळपाववर ताव मारायची मजाही काही वेगळीच..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटकी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मटकी एक ग्लास पाणी, हळद आणि चवीनुसार मीठ घालून एक शिट्टी काढून घ्यावी. आता कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात जिरे धने खोबरं भाजून घ्यावं. धने जिरे खोबरे भाजून झाल्यावर त्यात आलं-लसूण उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान परतून घ्यावे. परतलेल मिश्रण थंड करून मिक्सरला फिरवून घ्यावं.
- 2
आता कढईत परत चार ते पाच चमचे तेल गरम करून कढीपत्ता व चिमूटभर हिंग जिरे, मोहरी ची फोडणी करावी. आता मिक्सरला फिरवून घेतलेलं कांदा टोमॅटो चे मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. साधारण चार पाच मिनिटानंतर मिश्रणाला छान तेल सुटल्यानंतर त्यात हळद गरम मसाला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून परत एकदा दोन-तीन मिनिटासाठी परतून घ्यावे. कुकरला शिजवलेली मटकी घालून घ्यावी.
- 3
कितपत कट हवा आहे त्यानुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून छान दोन तीन मिनिटांसाठी उकळून घ्यावे. गरमागरम मिसळ फरसाण, बारीक चिरलेला कांदा,लिंबू आणि पावासोबत फस्त करावी.
- 4
अशा पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत मिसळचा
दही, एखादा गोड पदार्थासोबत घरबसल्या आस्वाद घ्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#msमहाराष्ट्रातील आवडती डिश म्हणजे चमचमीत मिसळ पाव Vinaya Deshpande -
मिसळपाव
#स्नॅक्स#शुक्रवार_मिसळ पाव#साप्ताहिक_ स्नॅक्स_ प्लॅनर "पुणेरी मिसळ"एकदा मी पुण्याला माझ्या भाच्याकडे गेली होती..त्याने आम्हाला एका मिसळ फेमस हाॅटेलमध्ये नेले होते.. मिसळपाव मागवले ... आम्ही आपले गुपचूप खात होतो..तेवढ्यात माझ्या भाच्याने शेखरला आवाज दिला आणि ओरडुन म्हणे खानदान आण... आम्हाला काही कळेना.. खानदान आण म्हणजे काय ते.. आम्हाला वाटले यांचे काही पुर्ववैर तर नाही... आता यांची भांडणं होणार...आम्ही आपले खायचं सोडून त्याला ओढत हाॅटेल बाहेर नेत होतो...तो म्हणे अरे मिसळ तर पुर्ण खाऊया, आम्ही म्हटलं नको बाबा,तु भांडायला लागलास, नको आम्हाला मिसळ... तो वेटर आणि भाचा दोघेही पोट धरून धरून हसत होते ... मिसळचा रस्सा आणि तर्री एक्स्ट्रा देतात म्हणे ते मी मागत होतो.. मला आठवण झाली त्या मिसळीची म्हणून आज मी पुणेरी मिसळ बनवली आहे.. लता धानापुने -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच. Sanskruti Gaonkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर वरून ही रेसिपी केली आहे. मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात थोड्या फार वेगळ्या प्रकारात बनवला जातो.हल्ली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होत असतात. त्यात होणारी गर्दी पहिली की लोकमिसळ पाव च्या किती प्रेमात आहेत ते कळते. त्यासाठी आज मिसळ पाव बनवली आहे. Shama Mangale -
मिक्स बीन्स मटकी भाजी (mix beans matki bhaji recipe in marathi)
भाजी रेसिपीमोड आलेल्या मटकीची उसळ, मिसळ सगळयांना आवडते. पण आज मी बीन्स (श्रावण घेवडा ) व मोड आलेली मटकी यांची मिक्स भाजी पोस्ट करत आहे. या कॉम्बिनेशन ने केलेल्या भाजीची खूपच छान टेस्ट लागते. टिफिन मध्ये देण्यासाठी मस्त भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
मसालेदार मिसळ पाव (masaledar misal pav recipe in marathi)
#स्नॅक्समिसळ हि झणझणीत असेल तर खायला मजा येते त्यासाठी तर्री आली पाहिजे आणि तर्री साठी काळ वाटण हवे म्हणजे मिसळ एकदम झणझणीत होते. चला तर मग आज बनवूयात मसालेदार मिसळ पाव. Supriya Devkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#crभन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात Charusheela Prabhu -
झणझणीत मिसळ
#कडधान्यमटकीची उसळ करून झाली तेव्हा १ वाटी मोड आलेली मटकी बाजूला ठेवली होती त्याचीच आज मी मटकीची झणझणीत मिसळ केली म्हणून मग मिसळ पाव करून घरच्यांना खाऊ घातले. जे आजच्या लॉकडाउन च्या काळात एकवेळचे जेवण म्हणून उपयोगी पडले. Deepa Gad -
-
झनझनीत खांदेशी मिसळ (khandeshi misal recipe in marathi)
#KS4#खांदेश _स्पेशलखांदेश जळगावला प्रसिद्ध असलेली झनझनीत मिसळ हे एक स्ट्रीट फुडचा प्रकार आहे .मिसळ आणि पाव असे सर्व्ह केले जाते.चला तर मग कशी झालीय ही रेसेपि बघूया. Jyoti Chandratre -
नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)
#HV#नाशिक_स्पेशन_मिसळ_थाळीडिसेंबर महिन्यात मस्त थंडी पडते. अशा वेळी काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. म्हणून सर्वांची आवडती गरमागरम मिसळ बनवली. वेगवेगळ्या प्रांतामधे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवतात. नाशिक मिसळ, कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, मुंबई मिसळ, इंदोर मिसळ आणि बरेच प्रकार आहेत. मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवत असते. यावेळी नाशिक स्पेशल मिसळ बनवली आहे. थंडीच्या दिवसात झणझणीत गरमागरम मिसळ खायची मजा काही औरच असते. मी बनवलेल्या मिसळीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
पुणेरी मिसळ /मिसळ पाव (misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटनक्षेत्रमिसळ हि कोल्हापूर, नासिक, पुणे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चवीची बनते.पुणेरी मिसळ बनवायला मला एक कारण बनलं. ह्या मिसळ मुळे जुन्या आठवणी जागे झाल्यात मी पुण्याला शिकायचे तेव्हा हॉस्टेल मध्ये राहायचे व माझी मेस लावलेली होती. कधी कधी खूप भूक लागायची मग आम्ही सर्व मैत्रिणी जमून बेत करायचो पुणेरी मिसळ खायला जायचा. मी आज ती मिसळ कूकपॅड च्या थिम मुळे घरी बनवली.थँक्स कूकपॅड 👌🙏 Deveshri Bagul -
सात्विक मिसळ (satwik misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #रेसिपी14 #सात्विकश्रावण महिना कांदा लसूण खायचा नाही त्यात लेकीचा मिसळ कर म्हणून लकडा मागे लावला.पण कांदा लसूण न घालता मिसळ चांगली होइल असे मला तरी नव्हते वाटत पण फक्त नारळ,आल,मिरची घालून मिसळ केली आणि अगदी टेस्टी झाली. Anjali Muley Panse -
पुणेरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमिसळ पाव म्हटलं की, आपल्याला लगेच पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, या शहराची आठवण होते. पण प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी मिसळ सोबत ब्रेड देतात. तर काही ठिकाणी मी सोबत पाव देतात. पण मी माझ्या पद्धतीने मिसळ पाव बनविलेला आहे. Vrunda Shende -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#मिसळ पावमहाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ पाव. झणझणीत तर्री आणि त्यात मटकी सोबत भिजलेला फरसाण वरून पिळलेले लिंबू पावासोबत खाताना वेगळ्या विश्वात जातो आपण. आणि त्यात मटकी चागंली मोड आलेली असेल तर मजाच Supriya Devkar -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#2#मिसळपाव कूकपॅड मुळे खरच नवनविन रेसिपी रायला उत्साह येतो. आणि स्नॅक प्लॅनिंग मुळे तर खरच मदत होतेय आणि वेळेचीही बचत होते. असाच एक स्नॅक मधला पदार्थ म्हणजे मिसळपाव....मिसळ करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते.नाव ही वेगवेगळे असतात,पुणेरी मिसळ,कोल्हापुरी चटका मिसळ,ईत्यादी. पण मी मात्र माझ्या पद्धतीने मस्त नागपुरी झणझणीत मिसळ केली आहे.हि मिसळ झणझणीत तर आहेच शिवाय स्वादिष्ट ही आहे.आणि सोबतच पौष्टीक ही.... Supriya Thengadi -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#मिसळपावमिसळ ही सगळ्यांची आवडती अशी एक डिश..प्रत्येक भागात ती वेगळी मिळते. अशीच माझी ही झणझणीत पण थोडी आंबट गोड अशी मिसळ. जान्हवी आबनावे -
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर #मिसळ पावमहाराष्ट्रीयन स्नॅक्समध्ये मिसळ पाव हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. बऱ्याचवेळा नाश्ता आणि जेवण यांचा सुवर्णमध्य साधणारा सर्वात उत्तम मेनू . सध्या थंडीचा मौसम आहे, अशावेळी चमचमीत, तिखट, तर्रीदार अशी ही मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अशावेळी न खाणारा खवय्या विरळाच!! आज मी ही अशीच झणझणीत मिसळीची रेसिपी देत आहे. Namita Patil -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर शुक्रवाररेसिपी नं 7. #Cooksnap चमचमीत, झणझणीत काटाकीर्र कटाची कोल्हापुरी मिसळ जिभेला धार काढणारी अशी one pot meal dish म्हणून प्रसिद्ध जगभरात.. याची चव म्हणजे अहाहा ,केवळ स्वर्गसुख.....नेत्रांना सुखावणारी आणि त्याचबरोबर रसनेला तृप्त करणारी ,खमंग मसालेदार चवीची...इतक्या विविध जिन्नसांची सरमिसळ असलेली अशी ही मिसळ,बरं त्यातील प्रत्येक जो जिन्नस आपण वापरतो त्याची स्वतःची अशी खास चव आहे,मसाल्यांची देखील खास चव आहे..स्वतःची खास ओळख आहे...असे असून देखील हे सर्व जिन्नस एकत्र केले की प्रत्येक पदार्थ स्वतःची चव add करत जातो आणि एकरूप होत होत मग तयार होते भन्नाट चवीची मिसळ.😋🔥...आहे की नाही विविधतेत एकता....Unity in diversity....ज्यांनी या पदार्थाला जन्म दिलाय ती व्यक्ती म्हणजेच शाहू महाराजांना शतकोटी प्रणाम🙏🙏 तर असे हे आपले अस्सल मातीतले पदार्थ आपल्याला जगवतात त्याचबरोबर कसे एकरूपतेने जगायचे हे ही कळत नकळत शिकवत असतात ... माझी मैत्रीण शितल राऊत हिची मिसळपावची रेसिपी मी cook snap केली आहे.. शितल अतिशय उत्कृष्ट खमंग अशी ही मिसळ चवीला झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much Shital for this yummilicious recipe 😍😋🌹❤️रसरशीत तांबडा बुंद झणझणीत कटाचा रस्सा, मटकीची उसळ त्यात सुखनैव बुडलेले फरसाण वरून पेरलेला कांदा आणि कोथिंबीर शेजारी लिंबाची फोड आणि सोबत लादी पाव..अहाहा.. हाच तो पृथ्वीवरचा स्वर्ग ...चला तर मग या स्वर्गाची सैर करूया.. Bhagyashree Lele -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#MWKमाझी विकेन्ड स्पेशल रेसिपी 😋मिसळ म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ त्याच्या झणझणीत पणामुळे आणि त्याच्या चवीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक हॉटेल मध्ये, धाब्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने खातात. मिसळ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि तो कमी वेळेत बनत असल्यामुळे गडबडीच्या वेळी आपण मिसळ बनवून खावू शकतो. मिसळ पाव हा मटकीच्या मोडाच्या आमटीचा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड प्रकार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसे कि काही ठिकाणी मटकीच्या मोडाची आमटी बनवली जाते. तर काही ठिकाणी मिक्स मोडाची म्हणजेच त्यामध्ये मटकी, मुग, वाटणे, मसूरा, आणि हरभरे या सारखी कडधान्ये असतात आणि या कडधान्यांना मोड आणलेले असते. तर आज मी बनवली आहे मटकी आणि कुळीथाच्या मोडाची मिसळ, चला तर मग याची रेसिपी बघुया... Vandana Shelar -
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
मिसळ म्हटल कि, डोळ्यासमोर येतो तो तीचा झणझणीतपणा.आणि मिसळपाव कुणाला आवडत नाही असं होऊ शकतं नाही.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#शुक्रवार_मिसळ पावपाहूनच तोंडाला पाणी सुटणारी मिसळ पावबऱ्याच प्रकारे ओळखली जाते लाल रसरशीत रस्सा आणि त्यामध्ये मटकीची उसळ, फरसाण,कांदा,लिंबू आणि सोबत पाव पर्वणीच नाही का.... Shweta Khode Thengadi -
कोल्हापूरी मिसळ (kolhapuri misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4काही वर्षांपूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला शाहू महाराजांचे करवीर नगर असेही म्हणतात. कोल्हापूर मधे शिरताच या जिल्ह्यातच उगम पावलेली पंचगंगा नदी आपल्याला पहायला मिळते. पाच नद्यांपासून बनलेली ही नदी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. नंतर आम्ही तेथील काळ्या आणि पाॅलीश केलेल्या राजमहालात महानगरपालिकेची राजाराम हायस्कूल ही शाळा आहे ती बघितली. त्याचा राजेशाही थाट बघण्यासारखा आहे, तिथे भेट दिली. नंतर तेथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो. महालक्ष्मी मंदिरातील परीसर खूपच सुंदर आहे. हे मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पिठांपैकी एक आहे. आणि महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. आम्ही देवीची ओटी भरुन छान दर्शन घेतले तेव्हा खूपच प्रसन्न वाटले. नंतर कोल्हापूर पासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या पन्हाळा किल्ल्याकडे निघालो.या पन्हाळा गडावर जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा महाराजांच्या सुटकेसाठी बाजी प्रभूंनी आपले बलिदान देऊन महाराजांना सोडवायला मदत केली होती. तिथून पुढे जोतीबाचे दर्शन घेऊन मग रंकाळा तलावाकडे फेरफटका मारुन, बोटींग करुन तेथील प्रसिद्ध कोल्हापूरी चपला घेऊन आमचा मोर्चा खादाडी करायला वळला. एका हाॅटेलमधे आम्हाला हवी असलेली कोल्हापूरी मिसळ घेतली आणि यथेच्छ ताव मारला. मी तिथे असलेल्या हाॅटेवाल्या मावशींना त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या मिसळीची रेसिपी द्यायची विनंती केली आणि त्यांनी ती आनंदाने मला सांगितली. त्याच मिसळीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मिसळ पाव(misal paav recipe in marathi)
#रेसेपिबुक #week2वीकेंड 2 ,रेसेपी 2मज्या husband ची ट्रान्स्फर कोल्हापूर 1 ईयर होती.त्यामूळे मला कोल्हापुरी मिसळ पाव खुप आवडते.संडे ला आमचा नाश्ता म्हणजे मिसळ पाव, Sonal yogesh Shimpi -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#मिसळ पाव रेसिपी Rupali Atre - deshpande -
मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#SDRझणझणीत मिसळ पाव हा चवीलाही छान लागतो व पोटभरीचा मेनू Charusheela Prabhu -
झणझणीत चटकदार मिसळपाव (misalpav recipe in marathi)
#ks2#पश्चिम #महाराष्ट्रमिसळ पाव लोकप्रिय महाराष्ट्रीयन नाश्ता आहे. मिसळ पाव मध्ये बरेच बदल आहेत. .मिसळ ही लोकप्रिय रेसिपी आहे. मुंबई ची मिसळ, पुणेरी मिसळ ,नाशिक ची मिसळ , कोल्हापूरी मिसळ, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते.झणझणीत मिसळपाव पाहून सगळ्याच्यांच तोंडाला पाणी सुटत.…. पोटभरीचे व पौष्टीक नाष्टा किंवा एकवेळच जेवणच म्हणता येईल अशी मिसळपाव लहानथोर सगळ्यांच्या आवडीचा मेनू .व्यक्ती तितक्या प्रकृती.. प्रत्येकाच्या मनातील मिसळीची संकल्पना वेगवेगळी असते.मी मिसळ मटकी आणि सफेद वाटाणे दोन्ही ची बनवते.. मिसळ म्हणजे मस्त तर्रीदार मटकीचा किंवा सफेद वाटण्याचा चविष्ट रस्सा.. फरसाण, त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर, लिंबू आणी मऊ लुसलूसीत पाव.. मन एकदम प्रसन्न...मिसळीला झणझणीत.. तर्रीदार चमचमीत, तिखटजाळकिती तरी उपमा दिल्या तरी कमीच आहेत.प्रांतानुसार चवित बदल होणार हा पदार्थ आहे. Prajakta Patil -
झणझणीत कोल्हापूरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr कोल्हापूर माझं माहेर.. इथे, तांबडा-पांढरा रस्सा, गोळीपुलाव, खांडोळी अशा अनोख्या मांसाहारी पदार्थांबरोबर च मिसळपाव, कटवडा, वडापाव, भेळ, दूधसार असा शुद्ध शाकाहारी खजिना ही खवय्यांची भूक चाळवतो. मिसळ चे माहेरघर म्हणून ही ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर मध्ये आता बर्याच मिसळी फेमस आहेत पण, लहानपणापासून खात असलेली आणि अजूनही चवीमध्ये तसूभरही फरक नसलेली "आहार" ची मिसळ ही माझ्या आजच्या मिसळ रेसिपी ची आदर्श आहे. कोल्हापूरी मिसळीचे वैशिष्ट्य हे तिथल्या कांदा लसूण मसाल्याचे आहे. तसंच, तिथं अजूनही मिसळ बरोबर स्लाईस ब्रेड च खाल्ला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरसाण! त्यात भावनगरी गाठिया आणि पापडी पेक्षा मुख्यपणे शेव + चिवडा हेच कॉम्बिनेशन जास्त हवे. Tried and tasted रेसिपी असल्याने ती अजिबात चुकणार नाही, नक्की रेसिपी करून पहा.. शर्वरी पवार - भोसले
More Recipes
टिप्पण्या