सिमला मिरचीचे लोणचे (shimla mirchi lonche recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA #week4

च्या पझल मध्ये सिमला मिरची हा क्लू ओळखून विचारच करत होते काय बरे बनवू?? आणि काय आश्चर्य बऱ्याच वर्षंपूर्वी खाल्लेलं सिमला मिरचीचे लोणचे आठवले.. माझी आई बनवत असे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मिन
३-४
  1. 1सिमला मिरची
  2. ४ टेबलस्पून चिंचेचा कोळ
  3. ४ टेबलस्पून गुळ
  4. १/२ टीस्पून मीठ
  5. १/२ टीस्पून हिंग
  6. १/२ टेबलस्पून मेथी दाणे
  7. 4-5हिरव्या मिरच्या
  8. १ टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

१०मिन
  1. 1

    सिमला मिरचीचे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यावेत. चिंचेचा कोळ गूळ घालून तयार करून घ्या.

  2. 2

    एका कढईत/पॅन मध्ये तेल घालून त्यात हिंग आणि मेथी दाणे घालून फोडणी करावी त्यातच सिमला आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून मीठ घालून झाकण ठेवून १-२min कमी गॅसवर वाफ आणावी.

  3. 3

    चांगली वाफ आली की मिरच्यांचे तुकडे मऊ होतात मग त्यात गूळ घालून केलेला चिंचेचा कोळ घालावा आणि १-२ गॅसवर चांगला उकळू द्यावे. छान चटपटीत आणि टिकाऊ लोणचे तयार....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes