मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#cr
भन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात

मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#cr
भन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीमोड आलेली मटकी
  2. 4कांदे
  3. 2 इंचखोबर
  4. 1टोमॅटो
  5. 7लसूण
  6. 1 इंचआलं
  7. 1/2 वाटीकोथंबीर
  8. 4 चमचेतेल
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 चमचाकांदा लसूण मसाला
  11. 1 चमचागोडा मसाला
  12. 1 चमचासंडे spl मसाला
  13. 1 चमचाकाश्मिरी तिखट
  14. 1/4 चमचाहळद
  15. चिमूटभरहिंग
  16. 1/2 चमचामोहरी
  17. 10कढीपत्ता

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    प्रथम मटकी निवडून ती कुकर मध्ये पाणी घालून शिजवून घ्यावी मग 2कांदा खोबर आलं लसूण टोमॅटो खमंग भाजून त्यात हळद कांदा लसूण मसाला,गोडा मसाला, संडे मसाला मीठ बारीक वाटावे

  2. 2

    कढईत तेल घेऊन त्यात हिंग मोहरी कढीपत्ता व काश्मिरी तिखट घालून वाटण घालावं छान परतावं मग शिजलेली मटकी घालावी लागेल तस पाणी घालून मिडीयम गॅस वर 10 मिनिट उकळत ठेवावं

  3. 3

    मग गॅस बंद करून खायला देताना मटकीची तर्रीदर उसळ कच्च कांदा कोथंबीर फरसाण व लिंबू किंवा दही घालून पाव किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करावी

  4. 4

    अतिशय टेस्टी व जिभेला संतुष्ट करणारी मिसळ सर्वांनाच खूप आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes