कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी
कडिपत्त्याची खमंग चटणी...
चटकदार चटण्याच चटण्या...
जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबा
छुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे..
चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना..
आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
4 जणांना
  1. 1 कपकडिपत्याची पाने
  2. 1/2 कपभाजलेले शेंगदाणे
  3. 1/4 कपभाजलेले तीळ
  4. 1 टेबलस्पूनडाळ
  5. 5-6हिरव्या मिरच्या
  6. 7-8लसूण पाकळ्या
  7. चवीनुसार मीठ
  8. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    प्रथम कडीपत्ता धुवून पुसून वाळवून घ्यावा.

  2. 2

    आता शेंगदाणे, तीळ, डाळ एकेक करुन भाजून घ्यावेत.

  3. 3

    एका कढईत तेल घालून मंद आचेवर कडीपत्ता परतून घ्यावा आणि मग त्यात शेंगदाणे, तीळ, डाळ, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परत एकदा मिश्रण तीन चार मिनिट तेलावर परतून घ्यावे.

  4. 4

    आता वरील मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये घालावे. त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात, चवीनुसार मीठ घालावे. आणि मिक्सरवर ओबडधोबड वाटून घ्यावे.

  5. 5

    अशा तऱ्हेने तयार झालेली खमंग कढीपत्ता चटणी भाकरी, पोळी, किंवा आमटी भाताबरोबर सर्व्ह करावी.

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (5)

Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Similar Recipes