आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#chutney

संत, महात्मे आणि मनावर संपूर्ण ताबा मिळविलेल्या काही मोजक्या सन्माननीय व्यक्तींचा अपवाद वगळता थोड्याफार फरकाने आपण सर्वच लोभी असतो. आपल्याला आपले जग कसे सर्व अंगांनी आपल्या फायद्याचे हवे असते. म्हणुनच उपरोधाने म्हणतात ना, माणसाला गाय कशी हवी असते? तांबड्या रंगाची, आखूड शिंगाची, कमी चारा खाणारी, जास्त दुध देणारी...अशी. दहाही बोटे तुपात आणि डोके कढईत अशी आपली चैनीची कल्पना. मुळात आपल्या चैनीच्या साऱ्या कल्पना खाण्यापाशी येवून थांबतात.

अशा परीकल्पनांना पुरून उरणारी 'आवळा' ही एक वनस्पती. तिच्या फळांनी ती हरप्रकारे आपल्या उपयोगी पडत असते. कफ-पित्त-वात यातील कोणत्याही विकारावर औषध म्हणून तसेच तरुण दिसण्यासाठी केसांपासून, त्वचेपर्यंत सर्वांगास उपयोगी असते. केसांचे तेल, शॅम्पू, साबण, सौंदर्यप्रसाधने, च्यवनप्राश, आयुर्वेदिक औषधे या सर्वात समाविष्ट होते. या शिवाय लोणचे, मोरावळा, सरबत, कँडी, चुर्ण, सुपारी... जे जे शक्य ते सारे आपण आवळ्या पासुन बनवतो. पण आपले लोभी मन इतक्याने समाधान पावणार कसे? म्हणूनच या लांबलचक यादीमध्ये भर घालण्यासाठी सादर आहे 'आवळ्याची चटणी'!

उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? आवळ्याचा सिझन सुरू झालाच आहे, एकदा करुनच पहा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 4आवळे
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. 4-5पाकळ्या लसूण
  5. 1/2 इंचआले
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. 1/4 टीस्पूनसैंधव मीठ
  9. 1/4लिंबाचा रस
  10. फोडणीसाठी
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आवळ्याचे तुकडे करून घ्यावेत. आता मोहरी व तेल वगळून बाकी सगळे साहित्य मिक्सर मधून फिरवून बारीक चटणी वाटून घ्यावी.

  2. 2

    Gas वर फोडणीचे भांडे ठेवून त्यात तेल चांगले गरम करून घ्यावे. त्यात मोहरी घालून तडतडली की फोडणी चात्नीवर घालावी. मस्त चटपटीत अशी बहुगुणी आवळ्याची चटणी तय्यार!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes