कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

कैरीची आंबटगोड चटपटीत चटणी या उन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी हमखास पानातील डाव्या बाजूला विराजमान झालेली दिसून येते..आधीच उन्हाळा,घाम, यामुळे जीव नकोसा होतो..पाणी पाणी होते..काही खायची इच्छा नसते..अशावेळेस आंबटगोड कैरीच्या विविध रेसिपीज धावून येतात आणि या कैरीच्या प्रत्येक रेसिपीची जी signature taste असते ..त्याने आपली रसना सुखावते..आणि त्याचा आस्वाद घेताना या उष्ण वातावरणाचा,वैशाख वणव्याचा आपल्याला क्षणभर विसर पडतो..इतके आपण या आंबटगोड रेसिपींमध्ये मश्गुल झालेले असतो..कारण शेवटी सगळी धडपड कशासाठी ..तर पोटासाठी.. खाण्यासाठीच तर अस्सल खवय्यांचा जन्म असतो..काय पटलं ना..चला तर या झटपट चटपटीत रेसिपी कडे जाऊ या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीटे
4जणांना
  1. 1 कपओले खोबरे
  2. 1 लहानकैरी
  3. 6-7लसूूूूण पाकळ्या
  4. 1 इंचआल्याचे तुकडे
  5. कोथिंबीर
  6. 10-12 पुदिन्याची पाने
  7. चवीनुसार मीठ
  8. 1/2 टीस्पूनसाखर
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1 टीस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

10मिनीटे
  1. 1

    प्रथम कैरी स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. नारळ खरवडून घ्यावा आणि इतर चटणी चे साहित्य जमा करून घ्यावे.

  2. 2

    आता वरील सर्व साहित्य मिक्सरच्या चटणी अटॅचमेंट मध्ये घालून चटणी व्यवस्थित बारीक वाटून घ्यावी

  3. 3

    आता वरील चटणीत लिंबू पिळावे. हवी असल्यास वरून फोडणी द्यावी. झाली आपली चटपटीत कैरीची चटणी तयार.

  4. 4

    कैरीची चटपटीत चटणी पोळी भात कशाबरोबरही सर्व्ह करा.

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes