कणिक गुळाचा शिरा (kanik gul sheera recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#पश्चिम#महाराष्ट्र शिरा किंवा हलवा म्हटलं की किती प्रकार ... त्यातीलच एक पौष्टिक प्रकार, कणिक गुळाचा शिरा. खूप छान लागतो चवीला...आणि साजूक तुपात कणिक खरपूस भाजून घेतली की त्याची चव विचारायलाच नको...नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटणार, ज्यांनी हा शिरा खाल्ला आहे.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 मेजरींग कप कणिक
  2. 2/3 मेजरींग कप साजूक तूप
  3. 2/3 मेजरींग कप गुळ
  4. 1 टीस्पून विलायची पावडर
  5. 2 टेबल्सस्पून सुक्‍यामेव्याचे तुकडे
  6. चिमुटभर मीठ
  7. 350 मिली पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवावी. त्यात तूप टाकावे. नंतर त्यात कणिक टाकून एकत्र करावे.

  2. 2

    तोपर्यंत एका बाजूला भांड्यात पाणी गरम करायला ठेऊन त्यात गुळ टाकून विरघळून घेऊन घ्यावे. कणिक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.त्याचा सुगंध पसरला पाहिजे. त्यात चिमुटभर मीठ व विलायाची पावडर टाका वे.नंतर त्यात गरम गुळाचे केलेले पाणी टाकावे.

  3. 3

    ते चांगले मिक्स करून घ्यावे. त्यावर झाकण ठेऊन 3_4 मिनिट ठेवावे. नंतर त्यात सुक्यामेव्याचे तुकडे टाकून छान एकत्र करावे.

  4. 4

    अशा प्रकारे चविष्ट व पौष्टिक कणिक गुळाचा शिरा तयार झाला. हा शिरा गरमागरम खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Similar Recipes