कणकेचा प्रसादाचा शिरा (Kankecha sheera recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#MLR...#कणकेचा प्रसादाचा शिरा..... आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिरा करतो रव्याचा शिरा उपासाचा राजगिरा चा शिरा बटाट्याचा शिरा रताळ्याचा शिरा तसाच मी हा कणकेचा शिरा केलेला आहे.... हा साजूक तुपातला कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मीनीटे
3-झणांसाठी
  1. 200 ग्रामगव्हाचे पीठ
  2. 120 ग्रामसाखर
  3. 120 ग्रामसाजूक तूप
  4. 1 टीस्पूनवेलचीपूड
  5. 2 टेबलस्पूनमिक्स सुके मेवे काजु, बदाम, मनुका
  6. 100 मी.लीपाणी
  7. 100 मी.ली.पाणी.
  8. 100 मी.लीपाणी

कुकिंग सूचना

30-मीनीटे
  1. 1

    साहित्य काढून घेणे....गॅसवर कढई ठेवणे आणि त्याच्यात दोन टेबलस्पून तूप गरम करणे.... त्यात कणीक टाकणे....

  2. 2

    मंद आचेवर 5 मिनिटे भाजून घेणे... परत थोडे तूप टाकून कणीक भाजून घेणे तसेच थोडे -थोडे तूप तीनवेळा टाकून कणीक छान खमंग भाजून घेणे.... दूध, पाणी एकत्र करून गॅसवर गरम करणे....

  3. 3

    कणीक तुपात छान भाजून झाली तूप सुटेपर्यंत की त्याच्या मध्ये गरम केलेले दूध आणि पाणी टाकणे आणि मिक्स करून घेणे....

  4. 4

    साखर टाकून मिक्स करणे नंतर वेलचीपूड टाकून मिक्स करणे....

  5. 5

    झाकण ठेवून एक वाफ येऊ देणे नंतर त्यात कट केलेले सगळे सुके मेवे टाकणे....

  6. 6

    बाउल मध्ये काढून वरून सुकामेवा टाकुन देवाला नैवेद्य दाखवणे आणि सगळ्यांना सर्व करणे.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes