कॅप्सिकम कोफ्ता करी (capsicum kofta curry recipe in marathi)

#rr
मान्सूनची चाहूल लागल्यावर पावसामुळे जास्त बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून मी ही रेसिपी बनविली आहे. फ्रिजमध्ये काही शिमला मिरच्या उरल्या होत्या. म्हणून मग शिमला मिरच्या आणि रोजच्या वापरामध्ये लागणारे साहित्य वापरून आखला बेत कॅप्सिकम कोफ्ता करी बनविण्याचा...बघूया मग रेसिपी
कॅप्सिकम कोफ्ता करी (capsicum kofta curry recipe in marathi)
#rr
मान्सूनची चाहूल लागल्यावर पावसामुळे जास्त बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून मी ही रेसिपी बनविली आहे. फ्रिजमध्ये काही शिमला मिरच्या उरल्या होत्या. म्हणून मग शिमला मिरच्या आणि रोजच्या वापरामध्ये लागणारे साहित्य वापरून आखला बेत कॅप्सिकम कोफ्ता करी बनविण्याचा...बघूया मग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिमला मिरच्या स्वच्छ धुवून घ्यावे आणि आतील बिया काढून बारीक किसून घ्यावी. (किसल्यावर मिरचीतून जर पाणी निघाले तर ते पाणी हाताने पिळून काढून घ्यावे.)
- 2
आता एका बाउल मध्ये किसलेली शिमला मिरची घेऊन त्यात धणे-जिरेपूड, तिखट, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, हळद आणि बेसन घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 3
मिक्स केलेल्या मिश्रणाचे छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्यावे. कढईत तेल तापवून सर्व बॉल्स मध्यम आचेवर गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे. सर्व बॉल्स एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवावे.
- 4
आता ग्रेव्ही बनविण्यासाठी त्याच कढईत तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यानंतर त्यात कांद्याची पेस्ट घालून 2 ते 3 मिनिटे कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
- 5
आता त्यात आले-लसूणपेस्ट, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो प्युरी टाकून मिक्स करून घ्यावे. प्युरी 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावी.
- 6
आता त्यात हळद, तिखट, धणे-जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे. आता त्यात ग्रेव्ही पुरते थोडे पाणी टाकावे आणि कढईवर झाकण ठेवून एक उकळी काढावी.
- 7
आता त्यात तळलेले कोफ्त्याचे बॉल्स टाकावे. वरुन गरम मसाला घालून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यावे.
- 8
कोफ्ते सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून कोथिंबीरने गार्निश करावे. गरमागरम कॅप्सिकम कोफ्ता करी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शाही मलाई कोफ्ता करी shahi malai kofta curry recipe in marathi)
#rr#रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीआज मी शाही मलाई कोफ्ता करी बनवली आहे आणि खरोखर अगदी रेस्टॉरंट सारखी झालेली आहे चव पण तशीच झाली आहे.घरात सर्वांना खूप आवडली आणि लगेच फस्त पण झाली😀 Sapna Sawaji -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
पंचरत्न डाळ कोफ्ता (panchratna dal kofta recipe in marathi)
#कोफ्तापाच डाळी वापरुन मी ही रेसिपी केली.खुप सोप्पी व अगदी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरुन खुप छान व लवकर तयार होणारी अशी ही कोफ्ता करी नक्की ट्राई करा Bharti R Sonawane -
-
सोयाबीन आलू कोफ्ता करी (soyabeen aloo kofta kari recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ते करताना आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो. कोफ्ता थीम मुळे आज कोफ्ता करी बनवायची संधी मिळाली. पण माझ्याकडे कोणत्याच भाज्या नव्हत्या आणि लॉकडाउनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. मग जे घरात पदार्थ आहेत त्यापासून कोफ्ते बनवायचं ठरवलं. सध्या पावसामुळे वातावरण पण थंड आहे त्यामुळे गरमागरम कोफ्ता करी तर व्हायलाच पाहिजे. स्मिता जाधव -
दुधीची कोफ्ता करी (dhudhi bhopala kofta curry recipe in
#कोफ्ता एरवी दुधीची भाजी अजिबात खात नाहित असे लोकही कोफ्ता करी फस्त करतात.हा अनुभव आहे. एकदा तुम्ही दुधी चीकोफ्ता करी खाल्ली ना तर दुधी भाजी ला नावं ठेवणार नाहीत Prajakta Patil -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
कॅबेज कोफ्ता.. (cabbage kofta recipe in marathi)
#GA4#week14#cabbageकॅबेज कोफ्ता ही एक मेनकोर्स डिश आहे. खायला रुचकर आणि तितकीच रिच ग्रेव्ही असलेली अशी ही रेसिपी..... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
फिश कोफ्ता करी (fish kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता या मुळच्या पर्शियन आणि आता भारतीय उपखंडात सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या रेसिपी बद्दल अनेकांनी या थिमच्या निमित्ताने लिहिले आहे. विशेषतः सुप्रिया वर्तक मोहिते यांनी या रेसिपीचा इतिहास थोडक्यात पण फार सुंदर पद्धतीने सांगितला आहे. त्यामुळे इतिहास फार न रेंगाळता लगेचच आपल्या मुळ मुद्दयाकडे येऊ.मी ही 'फिश कोफ्ता करी' बनविण्यासाठी खाजरी (Asian Sea Bass) या माशाचा उपयोग केला आहे (यात रावस किंवा सुरमई सुध्दा छान लागते). पावसाळा सुरू होऊनही खाडीच्या पाण्यातील ताजा मासा मिळाला. आणि या माशामुळे माझी रेसिपी परिपूर्ण झाली. माशाची कोणतीही डिश चविष्ट असतेच, त्यात त्याची कोफ्ता करी म्हणजे सोने पे सुहागा!!! Ashwini Vaibhav Raut -
-
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
पत्ता कोबिचे कोफ्ता करी (kobi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ..सगळ्यांना आवडणारी कोफ्ता करी ... Varsha Deshpande -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता पनीर म्हणजे हायप्रोटीन, म्हणून पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतेय, आणि आताची थीम साठी साजिशी रेसिपी म्हणून पनीर कोफ्ता करी. Sushma Shendarkar -
-
-
ड्राय मटन किमा कोफ्ता करी (mutton kofta curry recipe in marathi)
#कोफ्तानाॅनव्हेज रेसिपीज मध्ये किमा कोफ्ता करी यांना एक वेगळेच स्थान आहे. या रेसिपी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. कमी साहित्य वापरून देखील तूम्ही खूप चवदार कोफ्ता करी बनवू शकता तर चला मग बनवूयात.या रेसिपीच वैशिष्ट्य म्हणजे पोहे बाइडींग करता वापरून गोळे बनवून घेतले आहेत. Supriya Devkar -
लसुणी डाळ पालक ढोकळी (lasuni dal palak dhokli recipe in marathi)
#drकुकपॅडवर प्रसिद्ध होणारी आजची माझी ही 100 वी रेसिपी आहे. ही रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकविली आहे. त्यामुळे ही रेसिपी शिकवण्याचे श्रेय सुद्धा मी माझ्या मम्मीलाचं देते. बघूया मग रेसिपी..... सरिता बुरडे -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#kofta कोफ्ता हा की वर्ड घेउन मी ही लौकी कोफ्ता करी ची रेसिपी केली आहे.हि कोफ्ता करी फूलके किंवा पराठ्यासोबत छान लागते. Supriya Thengadi -
दुधी कोफ्ता करी (Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#GRU#मुल दुधी खात नाहीत.तुम्ही अशी दुधीची कोफ्ता करी करून बघा खुपच आवडेल मुलांना. Hema Wane -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्हीदुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील. Shama Mangale -
व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
#rr "कोफ्ता करी" keywords रेसिपीनेहमीच्या जेवणात बदल म्हणून गृहिणी नेहमीच तत्पर असते. थोडाफार बदल करून भाजी अजून लज्जतदार बनविण्याचा तिचा अट्टाहास असतो. त्यानिमित्ताने आता "रेस्टॉरंट स्टाईल" थीममुळे "व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी" ही रेसिपी बनविण्याचा प्रयत्न.. 🥰 Manisha Satish Dubal -
गोल्डन गुलाबजाम कोफ्ता करी (golden gulab jamun kofta curry recipe in marathi)
#rr" गोल्डन गुलाबजाम कोफ्ता करी " आज मी गोल्डन ग्रेव्ही आणि गुलाबजामुनचं कॉम्बिनेशन वापरून मस्त अशी स्पायसी आणि युनिक डिश बनवली आहे, खरंतर गुलाबजाम ची ग्रेव्ही ऐकून आधी थोडं टेन्शन आलं, पण या ग्रेव्ही ची टेस्ट इतकी भारी आलीय.... की दिल गार्डन गार्डन हो गया वाली फीलिंग आली खाताना....!!!बोले तो एकदम झकास...!!!👌👌 चला तर मग पटकन रेसिपी बघुया...👍👍👍 Shital Siddhesh Raut -
पनीर मलई कोफ्ता करी (paneer malai kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता करी बनवण्याची प्रोसेस जरी मोठी असली तरीसुद्धा तोंडत ठेवताच विरघळणारे असे हे पनीर मलई कोफ्ता एकदम लाजवाब झाले Nilan Raje -
-
मलई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#Key ward #Kofta Mrs. Sayali S. Sawant. -
-
टच मी नॉट कोफ्ता करी(kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकाल उसळ करायला काळे चणे भिजवले पण उत्सव करायचा कंटाळा आला त्याचे कोफ्ते आणि करी बनवले हे कोफ्ते मी आप्पेपात्रात बनवले तळले नाही आणि त्याच्यात कॉलीफ्लॉवर किंवा बेसन पण टाकलं नाही पहिल्यांदाच थीम साठी ट्राय केली खूप छान झाले Deepali dake Kulkarni -
बैदा कोफ्ता (Egg Kofta recipe in marathi)
#कोफ्ताप्राचीन पर्शियन (सध्याचे इराण, सौदी अरेबीया) देशाच्या समुह भागांमधे ओरीजिन असलेली हि रेसीपी... व्यापार मार्गाने जगभरात पोहचली आणि या रेसीपीने, स्वत:च्या मुलभुत रुपात इतर प्रादेशिक पद्धतींमधे सरमिसळ करत आज "खास मेजवानी" रेसीपी या गटामधे एक अढळ स्थान मिळवले आहे.कोफ्ता रेसीपी मधे प्रामुख्याने दोन भाग असतात... कोफ्ता बॉल्स् आणि ग्रेव्ही/करी, यात कोफ्ता बॉल्स् चे अनेक प्रकार व आकार बनवता येतात जसे की, मटण, चिकन, फळभाज्या, अंडी, पनीर वापरून गोल, लंबगोल, चौकोनी कोफ्ता इत्यादि...कोफ्ता रेसीपी मधे इराणी, अफगाणी, ईजिप्तशियन, तुर्की, कराची नरगिसी कोफ्ता करी असे अनेक प्रकार आहेत, पण ही रेसीपी भारतीय उपखंडाच्या किनारी प्रदेशात मुख्यतः मासे वापरूनही बनवली जाते.अत्यंत वेळखाऊ पण जीभेचे चोचले चाळवणारी ही कोफ्ता रेसीपी मी अंडा व पनीर यांचे फ्यूजन करुन बनवली आहे...(©Supriya Vartak-Mohite)तुम्ही पण नक्की बनवून पहा.... 🥰😊👍 Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या (2)