चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#rr

चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi)

#rr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 4उकळलेले अंडे
  2. 4 टेबलस्पूनतेल
  3. 1तेजपान
  4. 2 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टेबलस्पूनआले-लसूणपेस्ट
  6. 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  7. 1मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 4-5 टेबलस्पून तिखट
  10. 1 टेबलस्पूनधणे-जिरेपूड
  11. 1 कपटोमॅटो प्युरी
  12. चवीनुसारमीठ
  13. थोडेसे पाणी
  14. गार्निश करण्यासाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम अंड्याचे छिलके काढून घ्यावे. एका कढईत तेल घालून तेल तापल्यावर त्यात तेजपान टाकावे.

  2. 2

    त्यानंतर त्यात जीरे, आले-लसूणपेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकावे.

  3. 3

    आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.

  4. 4

    आता त्यात हळद, तिखट आणि धणे-जिरेपूड टाकावे.

  5. 5

    वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून मिक्स करून शिजवून घ्यावी.

  6. 6

    ग्रेव्हीला थोडे तेल सुटल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी घालून 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावी. (ग्रेव्ही थोडी घट्ट ठेवावी, जास्त पातळ करू नये.)

  7. 7

    अंडे मधोमध कट करून ग्रेव्हीमध्ये टाकावे. अंडे सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून त्यावर कोथिंबीर ने गार्निश करावे. चमचमीत अंडा मसाला चपाती सोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes