खमण ढोकळा (dhokla recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#पश्चिम #गुजरात
Post 2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
३ माणसे
  1. 1 कपबेसन
  2. 1/4 कपबारीक रवा
  3. 1/4 कपदही
  4. 1टिस्पून साखर
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनआलं मिरचीचं वाटण
  7. 2 टिस्पून इनो
  8. चवीनुसार मीठ
  9. 1/4 कपपाणी
  10. 1टिस्पून साखर
  11. 1/2लिंबू
  12. फोडणीसाठी:::
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. 1 टिस्पून मोहरी
  15. 1/2 टिस्पून हिंग
  16. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  17. 7-8कडिपत्याची पानं

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम कूकरची शिट्टी काढून कूकर मंद गॅसवर गरम करय ठेवा. १ कप बेसन पिठ,२ चमचे रवा,२ लहान चमचे साखर, आले मिरची पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल, चवीपुरते मीठ हे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात पाव कप दही घाला. मिश्रणात २ टिस्पून इनो घालून एकाच दिशेने हलवत रहा.

  2. 2

    मिश्रण फसफसायला लागले कि तेल लावलेल्या कूकरच्या भांड्यात ओतून घ्या. भांडे प्रीहिट केलेल्या कूकरमध्ये ठेवा. १५ मिनिटे ढोकळ्याचे मिश्रण वाफवून घ्या.

  3. 3

    जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्या. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करा.

  4. 4

    एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करा.. हे मिश्रण फोडणीत घाला.

  5. 5

    १५ मिनीटांनी गॅस बंद करा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढा. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरवा.

  6. 6

    गरम गरम ढोकळा हिरवी चटणी किंवा खजूरच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes