कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.
कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅम कारले
  2. 2 कपतेल
  3. 2बारीक चिरलेले कांदे
  4. 4 टेस्पूनतिखट
  5. 1 टेस्पूनहळद
  6. 1 टेस्पूनगूळ
  7. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कारले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आणि त्याचे बारीक गोल काप करून त्यामध्ये 1 टेस्पून मीठ घालून कारल्याच्या भाजीला चोळून 10 ते 15 मिनिटे ठेवावे. त्यानंतर त्यात पाणी घालून भाजी धुवून घ्यावी. असे केल्याने कारल्याचा कडुपणा निघून जातो.

  2. 2

    आता कांदे बारीक चिरून घ्यावेत.

  3. 3

    एका गंजात तेल घालून त्यात कांदे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यावे.

  4. 4

    कांदे लालसर झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि कारल्याची भाजी घालून साधारणतः 15 ते 20 मिनिटे भाजी तेलात फ्राय करून घ्यावी.

  5. 5

    भाजी फ्राय झाली की त्यामध्ये हळद, तिखट घालून मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    शेवटी गूळ टाकून भाजी मिक्स करून घ्यावी. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून भाजी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes